‘कृष्णा’च्या रणांगणात ‘जयवंत शुगर’च कळीचा मुद्दा

Suresh-Avinash-Indrajeet
Suresh-Avinash-Indrajeet

कऱ्हाड - सभासदांच्या मालकीच्या कृष्णा कारखान्याला झुकते माप न देता स्वमालकीच्या खासगी ‘जयवंत शुगर’ला झुकते माप देऊन कृष्णा कारखान्यातील सत्ताधाऱ्यांनी साफ फसवणूक केल्याचा आरोप करून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी कृष्णा कारखान्यातील सत्ताधारी भोसले गटाला थेट आव्हान दिले आहे. ‘जयवंत शुगर’ची वाटचाल हाच ‘कृष्णा’च्या सत्ताधारी गटाच्या विरोधातील मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे आगामी ‘कृष्णा’ची निवडणूक ‘जयवंत शुगर’ भोवतीच फिरणार आहे. त्यासाठी संस्थापक पॅनेलने शड्डू ठोकला आहे. त्याशिवाय भोसले गटाशी डॉ. इंद्रजित मोहिते यांनाही सवात सुभा यापूर्वीच मांडला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाभोवती पडणारे चक्रव्यूह भेदण्यासाठी भोसले गटाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागेल आहे. 

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह कारखान्याचे दुसरे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सत्ताधारी भोसले गटाविरोधात केलेल्या एल्गाराचे अनेक अर्थ आहेत. डॉ. मोहिते यांनी कोणत्याही स्थितीत मनोमिलनात जाण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांचे बंधू मोहिते गटाचे नेते मदनराव कदम यांनी भोसले गटाची कास धरली आहे. त्यामुळे डॉ. मोहिते यांची कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतील भूमिका एकला चलोरे अशी दिसत असली, तरीही त्यांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी स्पष्ट व रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलेले आहे. ते अधिक कडवे ठरू शकते, अशी सध्याची स्थिती आहे. 

श्री. मोहिते यांनी भोसले व मोहिते यांना सोडून ‘कृष्णा’ची निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केलेले आहे. श्री. मोहिते हे ‘राष्ट्रवादी’चे सरचिटणीस आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचे अनेक अर्थ आहेत. त्यांना पक्षाची साथ नक्कीच असणार आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर गाठून श्री. मोहिते यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आंदोलनातून त्यांनी सत्ताधारी भोसले गटाविरोधात आखलेल्या व्यूहरचनेकडे सत्ताधारी भोसले गट कसे पाहणार यावरही बरच काही अवंलून आहे. सत्ताधाऱ्यांची मानसिकता भांडवलशाहीची प्रवृत्ती आहे, असा आरोप करताना श्री. मोहिते यांनी त्याचे उदाहरणही दिले. श्री. मोहिते यांनी ‘जयवंत शुगर’ला झुकते माप अन्‌ कृष्णा कारखान्याला वेगळा न्याय दिला जात आहे. त्याच वेळी त्यांनी ‘कृष्णा’च्या ऊसतोडणीच्या टोळ्या गेटकेनसाठी तर ‘जयवंत शुगर’च्या टोळ्या ‘कृष्णा’च्या कार्यक्षेत्रात आणल्याचा डावही त्यांनी सप्रमाण उघड केला आहे. या स्थितीमुळे सभासदांमध्ये संताप आहे, असेही संस्थापक पॅनेलची स्पष्ट भूमिका आहे.

श्री. मोहिते यांनी सभासदांच्या मालकीच्या कृष्णा कारखान्याऐवजी आपला खासगी साखर कारखाना व्यवस्थित चालावा, यासाठी ते कारखान्याच्या सभासदांची फसवणूक करत असल्याचा आरोप श्री. मोहिते यांनी केला आहे. कायद्याच्या मदतीने तांत्रिकदृष्ट्या कृष्णा कारखान्यावर सत्ता गाजविणाऱ्यांनी चार वर्षांत सामान्य सभासदांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात सर्वसामान्य सभासदांत असंतोष खदखदत आहे.

त्या असंतोषाचे नेतृत्व संस्थापक पॅनेल करणार आहे, अशी ठाम भूमिका श्री. मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलून दाखविली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात त्यांनी पुकारलेला एल्गार अधिक कडवा होण्याची शक्‍यता आहे.

...या मुद्द्यांवर आहेत आरोप 
  कृष्णा कारखान्यापेक्षा ‘जयवंत शुगर’ला दिले झुकते माप 
  सत्ताधाऱ्यांच्या कारभाराने आर्थिक बेशिस्त वाढली
  भ्रष्ट कारभारामुळे गट ऑफिस जाळण्याचा प्रकार
  सत्ताधाऱ्यांनी राजकीय हेतूने वारस नोंदीला केला विलंब
  सभासदांना मागील हंगामातील उसाचे पूर्ण बिल न देता केला अन्याय 
  कामगारांचे वेळेवर पगार दिले नाहीत, त्यांना बोनस दिला नाही 
  कामगाराच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम देण्याचे टाळणे
  आधुनिकीकरणाच्या नावाखाली वारेमाप खर्च करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com