esakal | कृष्णा नदीची पाणीपातळी पुन्हा २५ फुटावर जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

dam

कृष्णा नदीची पाणीपातळी पुन्हा २५ फुटावर जाणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ११.०० वाजल्यापासून ३८ हजार ६३१ क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सध्या आयर्विन पुलाची पाणी पातळी ११ फूट इतकी असून त्यामध्ये वाढ होवून उद्या ( ता. १४) साधारणपणे २५ फूटापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले - मुंबई पोलिस

सध्यस्थितीतीत धरणातील पाणीसाठा व विसर्गाचा माहिती पुढीलप्रमाणे-

  1. कोयना धरण आजचा पाणीसाठा १०४.४९ धरण भरलेली टक्केवारी ९९.२८, विसर्ग (क्युसेस) ३८६३१.

  2. वारणा धरण आजचा पाणीसाठा ३४.३६ धरण भरलेली टक्केवारी ९९.८८, विसर्ग (क्युसेस) ८२०५.

  3. धोम धरण आजचा पाणीसाठा १२.४१ धरण भरलेली टक्केवारी ९१.९३, विसर्ग (क्युसेस) ६२०.

  4. कन्हेर धरण आजचा पाणीसाठा ९.७० धरण भरलेली टक्केवारी ९६.०४, विसर्ग (क्युसेस) २४.

  5. उरमोडी धरण आजचा पाणीसाठा ८.७५ धरण भरलेली टक्केवारी ८७.८५, विसर्ग (क्युसेस) ३००.

  6. तारळी धरण आजचा पाणीसाठा ५.५४ धरण भरलेली टक्केवारी ९४.७०, विसर्ग (क्युसेस) ३१०३.

धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहील्यास धरणामधील आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील ०२३३/२३०१८२०,२३०२९२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात २२.६ मिलिमिटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४.३ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात २२.६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमिटरमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज- १.६, जत- ०.३, खानापूर -२.२, वाळवा- ३.९, तासगाव- ०.८, शिराळा- २२.६, आटपाडी- १.०, कवठेमहांकाळ- ०.४, पलूस -१.८, कडेगाव- ७.४.

loading image
go to top