कुर्डूवाडी रेल्वे वॅगन दुरुस्तीच्या वर्कशॉपचे विस्तारीकरण होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

अकलूज - कुर्डूवाडी येथील रेल्वे कॅरेज व वॅगन दुरुस्ती वर्कशॉपचे विस्तारीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात 47 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या कामाची निविदाही निघाली आहे. त्यामुळे कुर्डूवाडी येथील ब्रॉडगेज व वॅगन दुरुस्ती क्षमता प्रतिमहिना 20 वरून 120 पर्यंत वाढणार आहे, अशी माहिती खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

मध्य रेल्वेने कुर्डूवाडी वर्कशॉपच्या विस्तारासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला होता.

या वर्कशॉपचे आणि पंढरपूर लोणंद हा प्रलंबित लोहमार्ग याचे काम मार्गी लावण्यात यश आल्याचा आनंद आहे. कुर्डूवाडी येथे वॅगन दुरुस्ती वर्कशॉपबरोबरच रेल्वे कोच दुरुस्तीचे वर्कशॉप सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे, असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

Web Title: Kurduwadi Railway Wagon Repairing Workshop Expansion