कुसुमताई नायकवडी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कुसुमताई नायकवडी (वय ८३) यांचे नुकतेच निधन झाले. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या त्या पत्नी होत.

वाळवा - पद्मभुषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी श्रीमती कूसुमताई तथा माई वय 87 यांचे आज निधन झाले. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या वाटचालीत त्यांचे मोठे योगदान होते.त्यांच्या निधनाने हुतात्मा उद्योग समूहात शोककळा पसरली आहे. दोन दिवसापूर्वी त्याना मिरज येथील मिशन हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज रात्री सव्वा नऊ वाजता त्यानी अखेरचा श्वास घेतला. श्रीमती कुसुमताई हुतात्मा परिवारात माई म्हणुन परीचीत होत्या.

अतिशय धाडसी आणि रोखठोक स्वभावाच्या कुसुमताई कोणत्याही विषयाला तडक भिडायच्या.देशाचा स्वातंत्र्यलढा लढताना  नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या संसाराचा गाडा त्यानी ताकदीने ओढलाकिसान शिक्षण संस्थेच्या विविध घडामोडीच्या त्या साक्षीदार होत्या. या संस्थेच्या जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर त्यानी प्रदिर्घ काम केले. विद्यार्थी आणि विद्यार्थीनीमध्ये त्यांचा मोठा धाक होता. त्यांच्या मागे हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी, हुतात्मा बॅंकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, डाॅ सुषमा नायकवडी, सौ.नंदिनी नायकवडी, नातू गौरव नायकवडी यांच्या सह मोठा परीवार आहे. उद्या सकाळी त्यांचे पारथीव हुतात्मा विद्यालयात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्या नंतर दुपारी अंत्य यात्रा निघेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kusumtai Nayakawadi passed away

टॅग्स