मजुरांपेक्षाही पंचांना कमी मानधन

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सातारा - खासगी बांधकामावरील तसेच शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या मजुरापर्यंतच्या घटकांना दिवसाला ५०० रुपये दिले जातात. परंतु, आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वितेसाठी दिवसभर मैदानावर कार्यरत असणाऱ्या पंचांना शासन केवळ प्रति दिवस १५० रुपयांचे मानधन देते. या मानधनाच्या रकमेत दुप्पटीने वाढ व्हावी, अशी अपेक्षा एकविध क्रीडा संघटनांची आहे. 

राज्यात आगामी काळात तालुका, जिल्हास्तरीय, विभागीय तसेच राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होईल. राज्यातील बहुतांश तालुक्‍यांत प्राथमिक टप्प्यात दहा खेळांचे तसेच जिल्हास्तरावर एकूण ४२ खेळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. कोल्हापूर विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांत सध्या तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशस्वी संघांची अथवा खेळाडूंची कोल्हापूर विभागासाठी निवड होते. सातारा जिल्ह्यात यंदा सुमारे ९३० शाळांनी क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी नोंदणी केली आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकविध क्रीडा संघटनांद्वारे अथवा त्या-त्या स्पर्धांतील तज्ज्ञ पंचांची नियुक्ती केली जाते. पंचांमध्ये बहुतांश जण हे २५ ते ५५ वयोगटापर्यंतचे असतात. काही शासकीय, खासगी नोकरीत, व्यवसायात असतात. ही मंडळी क्रीडा कार्यालयाच्या सूचनेनुसार दोन किंवा तीन दिवस मैदानावर काम करतात. तालुकास्तरीय स्पर्धांत कामगिरी बजावणाऱ्या पंचांना प्रति दिन १०० रुपये, जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धांत कामगिरी बजावणाऱ्या पंचांना प्रति दिन १५० रुपये दिले जातात.

शासनाद्वारे दिली जाणारी मानधनाची रक्कम ही तुटपुंजी असल्याने त्यामध्ये १५० रुपयांनी वाढ करावी, अशी अपेक्षा एकविध क्रीडा संघटनांकडून व्यक्त होत आहे. 

सध्या मिळणारे मानधन
 तालुकास्तर- १०० रुपये
 जिल्हा, विभाग व राज्यस्तर- १५० रुपये (प्रतिदिन)

Web Title: Labour Sports referee Honorarium