मंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरटे झाले मालामाल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची स्वागत मिरवणूक नुकतीच काढण्यात आली होती. या मिरवणूकीत चाेरटे घुसले आणि त्यांनी लाखाे रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

कऱ्हाड ः सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वागत मिरवणुकीवेळी गर्दीतून निघालेल्या युवकांच्या गळ्यातील सुमारे एक लाख 12 हजार किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घडली.
हेही वाचा -

aschim-maharashtra/sahyadris-expansion-will-be-soon-says-balasaheb-patil-214206" target="_blank">सह्याद्रीची विस्तारवाढ करणारच : पाटील

गणेश आनंदराव कोळी (रा. सोमवार पेठ) यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान याच मिरवणुकीत कमलाकर सदाशिव कांबळे (रा. शुक्रवार पेठ) व नितीन बाळासाहेब साळुंखे (रा. आगाशिवनगर) यांच्याही सोन्याच्या चैनवर चोरट्यांनी डल्ला मारला.
 
सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची स्वागत मिरवणूक नुकतीच काढण्यात आली होती. कन्याशाळा ते ज्योतिबा मंदिर परिसरा दरम्यान ही मिरवणूक आली. त्या वेळी श्री. कोळी त्यामिरवणुकीतील गर्दीतून वाट काढत निघाले होते.
 
ज्योतिबा मंदिरानजीक ते मिरवणुकीतून बाहेर पडले. त्यांच्या वाहनाजवळ पोचल्यानंतर गळ्यातील एक लाख 12 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची चैन चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबाबत त्यांनी शहर पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली. याच मिरवणुकीत कमलाकर कांबळे व नितीन साळुंखे यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

हेही वाचा - उदयनराजेंना चीतपट करणारे बाऴासाहेब झाले मंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakhs Of Rupeess Gold Stolen In The Ministers Procession