
कवठेमहांकाळ : ‘तुमच्या नावावरचे शेत माझ्या नावावर करा,’ या कारणावरून भावाला विळ्याने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार शनिवारी (ता. २१) पोलिसांत दाखल झाली. सायंकाळी सातच्या सुमारास इरळी येथे हा प्रकार घडला. तानाजी शामराव माने (मोघमवाडी) याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.