भुमीअभिलेख उपअधिक्षकाला लाच घेताना अटक

राजेंद्र सावंत 
बुधवार, 4 जुलै 2018

पाथर्डी : येथील उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयातील भुकरमापक शशिकांत सुग्रीव केंद्रे (वय-26 वर्षे) याला एका शेतकऱ्याला लाच मागीतली म्हणुन अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला असुन अटक केली आहे. तालुक्यातील पिपंळगाव टप्पा येथील एका शेतकऱ्याने पाथर्डीच्या उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयाकडुन जमीनीची मोजणी करुन घेतली होती. मोजणीप्रमाणे नकाशा तयार करुन देवुन प्रकरण निकाली काढण्यासाठी शेतकऱ्याकडे भुकरमापक शशिकांत केंद्रे याने अठ्ठावीस मे 2018 ला दहा हजाराची लाच मागीतली.

तडजोडी अंती लाचेची रक्कम 8 हजार रुपये ठरली होती. अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पोलिस निरीक्षक शाम पवरे व दिपक करांडे, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, विजय गंगुल, काधा खेमनर यांनी बुधवारी दुपारी उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयात येवुन केंदे याला ताब्यात घेतले. तेथून पोलिस ठाण्यात आणले व त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दिपक करांडे यांनी फिर्याद दिली असुन शशिकांत केंद्रे याच्या विरु्द्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम सात, पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Web Title: Land Records Deputy Superintendent arrested for bribe