जवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार      

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

निपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता. 14) पहाटे सिक्कीम येथील गंगटोक येथे अपघाती मृत्यू झाला होता. आज सकाळी रोहितचे पार्थिव अाडीत दाखल झाले. त्यानंतर दुपारी शासकीय इतमामात मानवंदना देऊन रोहित यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

रोहितचा  सेवा बजावताना मृत्यू  झाल्याची बातमी मिळाल्यानंतर आडी परिसरावर शोककळा पसरली होती. गेल्या दोन दिवसांपासून गावातील सर्व तरुण मंडळांसह ग्रामपंचायत व ग्रामस्थ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. सिक्कीमहून बुधवारी (ता. 16)  रात्री विमानाने पुण्यात रोहितचे पार्थिव दाखल झाले. त्यानंतर आज (ता. 17) सकाळी आठ वाजता कोल्हापूर मार्गे पार्थिव आडीत पोचले.

सर्वप्रथम देवर्डे कुटुंबीयांच्या घरी पार्थिव काही वेळ ठेवण्यात आले. त्यानंतर  सजवलेल्या वाहनातून  पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जवान रोहित देवर्डे अमर रहेच्या घोषणा उपस्थितांनी दिल्या. मिरवणुकीनंतर पार्थिव  डीपीइपी शाळेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथून मुख्य मार्गाच्या बाजूला रोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस व सैन्य दलाच्या वतीने हवेत गोळ्यांच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

राहुल देवर्डे यांनी मुखाग्नी दिला. सहाय्यक पोलीस अधीक्षक मिथुन कुमार, प्रांताधिकारी रवींद्र करलींगनावर, तहसीलदार महादेव बनसे यांनी प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी  विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: last rituals done on soldier rohit devarde