लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी  "येथे' झाली महाआरती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

- दीर्घायुष्याकरिता "श्रीं'च्या चरणी साकडे

अक्कलकोट : भारतरत्न, गानसाम्राज्ञी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या मार्गदर्शिका लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी न्यासाच्या वतीने महाआरती व श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लघु रुद्राभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याकरिता "श्रीं'च्या चरणी साकडे घालण्यात आले. 
भारतरत्न, गानसम्राज्ञी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या मार्गदर्शिका लता मंगेशकर यांची प्रकृती सोमवारी बिघडल्याने त्यांना ब्रीच कॅंन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ब्रीच कॅंन्डी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी न्यासाच्या वतीने महाआरती व श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लघु रुद्राभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याकरिता "श्रीं'च्या चरणी साकडे घालण्यात आले. 
या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍याम मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, संतोष भोसले, सिद्धाराम कल्याणी, एस. के. स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, सौदागर कोष्टी, बाळा पोळ, नामा भोसले, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, कल्याणी देशमुख, धनंजय निंबाळकर, प्रकाश गायकवाड, ज्ञानेश्‍वर पवार, अमित थोरात, अप्पा हंचाटे, प्रसाद हुल्ले, लक्ष्मण पाटील, मलंगशहा मकानदार, शरद भोसले, दत्ता माने, राजेंद्र पवार, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, स्वामीनाथ बाबर, बालाजी गवंडी यांच्यासह वारकरी, सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lata Mangeshkars EXcellency for Health