
Shock in Sangli: Women molested and attacked with knife during Ganesh visarjan procession.
Sakal
सांगली: शहरातील बापट बाल शाळेजवळ घरगुती गणपती विसर्जनासाठी निघालेल्या महिला व तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांवर संशयिताने चाकूहल्ला चढवत दोघांना गंभीर जखमी केले. काल रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने सांगली शहर पोलिसातं फिर्याद दिली आहे.