सोलापूर - मंगळवेढा तालुक्यात कायद्याचा धाक कमी - आ. भालके

हुकूम मुलाणी
मंगळवार, 27 मार्च 2018

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील वाढत चाललेली गुन्हेगारी व आरोपींवर पोलीसांचा कमी झालेला वचक यामुळे शहर व ग्रामीण जनतेच्या मनातील घबराटीच्या वातावरणामुळे कायद्याचा धाक कमी झाल्याने आ. भारत भालके यांनी विधानसभेत आवाज उठविला. प्रलंबित पोलीस ठाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्याबाबत आग्रह धरला.    

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील वाढत चाललेली गुन्हेगारी व आरोपींवर पोलीसांचा कमी झालेला वचक यामुळे शहर व ग्रामीण जनतेच्या मनातील घबराटीच्या वातावरणामुळे कायद्याचा धाक कमी झाल्याने आ. भारत भालके यांनी विधानसभेत आवाज उठविला. प्रलंबित पोलीस ठाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्याबाबत आग्रह धरला.    

आ. भालके यांनी वर्षाभरातील तालुक्यातील गुन्हेगारीवर आवाज उठवत तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचे सध्यस्थिती मांडत अवैध व्यवसायातून पैसे मिळत असल्याने यासाठी हे व्यवसायीक कोणताही मार्ग स्विकारण्यास तयार असतात. पोलीसांच्या ताब्यात आचारसंहीता काळात परवानाधारकाची बंदुक पोलीस काॅस्टेबल कडून चोरल्या जातात, मागायला गेलेल्या परवानाधारकास परत पाठवले जाते. शेवटी पोलीसच चोर निघाला. महिला पोलीसांच्या पतीने सी.आय.डी असल्याने व्यवसायकास व वाहनधारकास लुटत होता.

नंदूर येथील अमीर मुलाणी या चौदा वर्षे बालकाच्या खुन्याच्या तपास दोन वर्षे झाली तरी पोलीसांना पत्ता लागत नाही. सिमावर्ती भागातुन तालुक्यात गुटखा जात असताना झालेल्या गुटखा कारवाईत सापडलेल्या मुद्देमालातील पाच लाखांचा ऐवजी पोलीस ठाण्यातून चोरून अन्यत्र विकला गेला सोड्डी येथील कस्तुराबाई बिराजदार वयोवृद्ध महिलेल्या गळ्यातील दागीन्यासाठी दरोडेखोरांनी या वृद्ध महिलेचा खून केला.

जिल्हा पोलीस प्रमुखासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देऊनही एका आरोपीस पकडले अन्य आरोपीस अटक करण्यात यश आले नाही. या मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यास ही आरोग्य विभागाने हद्दीच्या कारणावरून दुर्लक्ष केले आणि जिल्हा पथकाला याच गुन्ह्यातील  आरोपीला मोहोळ येथे पडताना आरोपी कडूनच प्रत्युत्तर देताना सामान्य नागरिकाचा मृत्यू होणे यामुळे पोलीसाचा आरोपीवर असणारा वचक कमी झाला. पंचायत समीती सभापतीच्या खत दुकानांची चोरी होवून आरोपीच्या अटकेसाठी पुरेसे पोलीस खात्याकडे मनुष्यबळ नसल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. गुन्हेगार शिरजोर होवू लागल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवाय पुर्व भागातही पोलीसावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तालुक्यात खुन, दरोडे, अपहरण या घटनेत वाढ होत असताना पोलीसाचा गुन्हेगारांवरील व वचक कमी झाल्यामुळे खमख्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी विधानसभेत केली.

Web Title: law and order not have any pressure in mangalwedha