
विटा: येथील ॲड. विशाल कुंभार यांना पोलिसांनी शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याच्या विरोधात विटा वकील संघटनेने आज विटा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या मारला. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलिस उपाधीक्षक विपुल पाटील यांना देण्यात आले. दरम्यान, विपुल पाटील यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित वकिलांना दिले.