सांगलीत देशातील पहिले वकील प्रशिक्षण केंद्र

सांगलीत देशातील पहिले वकील प्रशिक्षण केंद्र

सांगली - देशातील पहिले वकील प्रशिक्षण केंद्र येथे साकारण्यात आले आहे. सांगली वकील संघटनेच्या पुढाकारातून हे केंद्र उभारण्यात आले असून, शनिवारी  (ता.२०) उद्‌घाटन होणार आहे. विजयनगर येथील न्यायालय इमारतीच्या आवारात सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम होईल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर प्रमुख पाहुणे असतील.  

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती रणजित मोरे, सांगली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती संदीप शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश भालचंद्र देबडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत असेल,  अशी माहिती जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रमोद भोकरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सोहळ्यादरम्यान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचेही उद्‌घाटन होणार आहे.
ॲड. भोकरे म्हणाले,‘‘परिपूर्ण व अभ्यासक वकील  तयार होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सखोल ज्ञान येथे देण्यात येणार असून न्यायालय  प्रक्रियेची माहिती नवोदितांना दिली जाणार आहे.  देशातील विविध न्यायाधीश व नामांकित कायद्यातील  गाढे, निष्णांत अभ्यासक वकील व संबंधित विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

प्रशिक्षण केंद्रामध्ये महिन्यात दोन कार्यशाळा राज्याबाहेरील आणि स्थानिक कायदेपंडित किंवा न्यायाधीशांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ॲड. महेश जेठमलानी, ॲड. अमित देसाई, ॲड. शिरीष गुप्ते, ॲड. उज्ज्वल निकम, ॲड. अशोक मुंडरगी यासह देशभरातील अनेक विद्वान वकील आणि न्यायमूर्ती मार्गदर्शनासाठी येणार आहेत.’’

ते म्हणाले,‘‘प्रशिक्षण केंद्रासाठी प्रमुख समन्वयक समिती असणार असून जिल्हा न्यायालयीन इमारतीत अडीच तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व वकिलांना याचा लाभ होणार आहे. अशी संकल्पना राबविणारी सांगली वकील संघटना ही देशातील पहिली वकील संघटना आहे. ॲड. जे. व्ही. पाटील,  ॲड. सुदत्त पाटील व ॲड. केदार पाटील यांचे मोठे योगदान केंद्र उभारण्यासाठी आहे.’’ यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. सचिन पाटील, सचिव ॲड. अशोक शेलार, ॲड. सुदत्त पाटील व वकील संघटनेची कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com