Belgaum : बार असोसिएशनसाठी शनिवारी निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lawyer Election

बेळगाव : बार असोसिएशनसाठी शनिवारी निवडणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - वकिलांसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या बार असोसिएशनसाठी शनिवार (ता.२०) निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात अनेक नामवंत वकील उतरले असल्याने निवडणुकीमध्ये रंगत भरली आहे.

बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आणि महिला प्रतिनिधी पदासाठी अनेक जण रिंगणात उतरले आहेत. यामध्ये पहिल्यांदाच अनेकजण आपले नशीब आजमात आहेत. उद्या सकाळी १० ते ५.३० पर्यंत बार असोसिएशनच्या सभागृहात मतदान होणार आहे. तर सायंकाळी ६.३० नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. उद्या संभाव्य पदाधिकाऱ्यांचे भवितव्य ठरणार असल्याने आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवाराकडून मतदार वकिलांच्या गाठीभेटी घेण्यात येत होत्या. एकंदरीत शुक्रवारी दिवसभर न्यायालयात केवळ निवडणुकीचे वातावरण पहावयास मिळाले. निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. संजय तुबची उद्या काम पाहणार आहेत.

loading image
go to top