बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही; फलटणच्या राजेंनी भाजपात जावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

नो एलपीआर, नो सीएएव, नो एनआरसी यासाठी राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे. ही माेहिम १२ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत भटके, विमुक्त बहुजन, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाणार आहे.

सातारा : साताराच्या दोन्ही राजांकडे कित्येक वर्षे सत्ता असतानाही त्यांना साताऱ्याचा विकास करता आला नाही. आता भाजपमध्ये जाऊन ते काय काम करणार अशी खरमरीत टीका उपराकार लक्ष्मण माने यांनी केली. दरम्यान फलटणच्या राजेंनीही भाजपामध्ये जावे हीच माझी इच्छा असून बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही असेही परखडपणे त्यांनी नमूद केले.
 
भटक्‍या विमुक्त, बहुजन वंचितांच्या नागरिकांच्या शोधयात्रेची माहिती देण्यासाठी लक्ष्मण माने यांची नुकतीच सातारा शहरात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले शरद पवार यांचे नेतृत्व मी पहिल्यापासून मानत आलो आहे. मध्यंतरी दोन्ही राजे राष्ट्रवादीत असल्याने मी वेगळी भूमिका घेतली होती. आता दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्याने मी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. साताऱ्याच्या दोन्ही राजांकडे कित्येक वर्षे सत्ता होती. तरी त्यांनी विकासकामांकडे दुर्लक्ष केले. जनता आर्थिकदृष्टया सबल होऊ नये यासाठीच त्यांनी साताऱ्याचा विकास रोखला. आता भाजपमध्ये जाऊन ते काय करणार आहेत. आता फलटणच्या राजांनीही भाजपमध्ये जावे. मी कधी कोणाचा आदेश मानून काम करत नाही. भटक्‍या विमुक्तांना न्याय देण्यासाठी झगडत राहणार, माणसांना छळण्यात काही लोकांना मजा वाटते अशी माणसे जनतेपासून दूर जातात याचा प्रत्यय साताऱ्यात येत आहे. सातारच्या जनतेने वेळीच सावध व्हावे असेही माने यांनी नमूद केले.

हेही वाचा : Video : कानून के हात बडे लंबे हाेते है...इथं तर 

लक्ष्मण माने म्हणाले आम्ही भारतीय आहोत आणि मरेपर्यंत भारतीय राहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हांला जन्मतःच नागरिकत्व आणि राज्य घटनेने मूलभूत अधिकार दिले माहेत. हे अधिकार काढून घेण्याचा सरकारला अधिकार नाही. नो एलपीआर, नो सीएएव नो सआरसी यासाठी राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे. ही माेहिम १२ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत भटके, विमुक्त बहुजन, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाणार आहे.

वाचा : अजित पवार आणणार कराडला औद्योगिक कॉरिडोर ?

केंद्र सरकार लादत असलेल्या या कायद्यांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले घटनेतील मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत. आमच्यापैकी कोणीही १९५० पूर्वीचा जन्म-मृत्यूचा दाखला किंवा स्थावर जंगम मालमतेचा महसुली दाखला पुरावा म्हणून दाखवू शकत नाही, ज्या व्यक्तीचा १९५० पूर्वीचा दाखला नसेल किंवा पुरावा नसेल ती व्यक्ती कायद्याने घुसखोर ठरते. त्याचा फटका भटक्या विमुक्त जातीना असणार आहे. याविरोधात सारा समाज एकजुटीने उभा राहिला पाहिजे, यासाठी ही शोधयात्रा काढण्यात येत आहे. ही शाेधयात्रा अशी आहे. दि. ७ मार्च ते ९ सांगली, दि.१० ते ११ सोलापूर, दि. १२ सातारा, दि.१३ ते १५ उस्मानाबाद, दि.१५ ते १८ लातूर, दि.१९ ते २९ बोड, दि. २२ सातारा, दि.२० ते २४ औरंगाबाद, दि. २५ ते २९ जळगाव, दि.२० ते २८ नाशिक, दि. २९ ते 30 नगर, दि. 31 सातारा, दि 1 ते 3 एप्रिल पुणे, दि.४ ते ६ ठाणे, दि. ७ ते ९ रायगड (सिंधुदुर्ग), दि.१० ते १५ पिंपरी- चिंचवड, पुणे शहर, दि.१२ एप्रिलला बारामती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxman Mane Critices Udayanraje And Shivendraraje In Satara