esakal | Video : कानून के हात बडे लंबे हाेते है...इथं तर
sakal

बोलून बातमी शोधा

Video : कानून के हात बडे लंबे हाेते है...इथं तर

दरम्यान हा प्रकार नेमका चोरीचा आहे की अन्य याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात (दुपारी चारपर्यंत) कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती. 

Video : कानून के हात बडे लंबे हाेते है...इथं तर

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टाेलनाक्यावरील एक प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. हे सीसीटीव्ही फुटेजमधील प्रकाराने व्हायरल झालेला हा व्हिडिआे पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त हाेत आहे.  

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यात आनेवाडी येथे टोलनाका आहे. या टोलनाक्‍यावरुन दररोज हजारो नागरीक प्रवासी करीत असतात. या टोलनाक्‍यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. यामुळे येथे घडणाऱ्या घटना चित्रीत होत असतात.

आज (मंगळवार) दुपारी पाऊणच्या सुमारास पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी टोल नाक्‍यावर एक अलिशान वाहन येऊन थांबले. ज्या ठिकाणी हे वाहन थांबले. तेथील टोल बूथमध्ये कर्मचारी नव्हता. त्या वाहनातील युवकाने ते पाहिले. तो युवक वाहनातून खाली उतरुन टोल बूथजवळ गेला आहे. काही सेकंदात टोलबूथमध्ये कर्मचारी आला. त्याने युवकास हातवारे करुन काही तरी विचारले. त्यानंतर संबंधित युवक वाहन घेऊन पुढच्या प्रवासास रवाना झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून याची खूमासदार चर्चा नेटीझन्समध्ये सुरु आहे. दरम्यान हा प्रकार चोरीचा आहे की अन्य याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात (दुपारी चारपर्यंत) कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.  

जरुर वाचा : ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकारहेही वाचा : हुतात्मा संदीप सावंत कुटुंबियांना 50 लाखांची मदत

वाचा : लढवय्या ते राजकीय मुत्सद्देगिर : शिवपुत्र छत्रपती राजाराम 

जरुर वाचा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल; रब्बी पिकांसह फळबागांना फटका

हेही वाचा : Video : साताऱ्यात पाच घरांसह दुकान फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद
 

loading image
go to top