एलबीटी प्रश्‍नी व्यापाऱ्यांनी बांधली राज्यव्यापी मोट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सांगली - थकीत एलबीटीप्रश्‍नी महापालिका प्रशासनाने जप्तीच्या नोटिशी बजावल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे बैठक घेतली. कुटुंबप्रमुख मोहन गुरुनानी, अध्यक्ष दीपेन अग्रवाल, उपाध्यक्ष राजू राठी, सोलापूरचे जव्हेरचंद गाला, देवेन दानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापालिका प्रशासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा ठराव करून शासनाकडे पाठवला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडू, अशा निर्धारही यावेळी करण्यात आला. 
अभय योजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांची नव्याने कोणत्याच प्रकारची तपासणी न करता त्यांना बजावलेल्या नोटिशी रद्द कराव्यात. त्यांच्यावरील सर्व प्रकारच्या फौजदारी कारवाया मागे घ्याव्यात. खासगी सीए पॅनेल रद्द करा, या मागण्या प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या आहेत. त्यासाठी शासनाकडे एलबीटी ऍसेसमेंट करणार नाही असा ठरावच तयार करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावेळी व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, माजी महापौर सुरेश पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे सचिन पाटील, उद्योजक संजय अराणके, सुरेश पटेल, सोनेश बाफना, धीरेन शहा, सुदर्शन माने, मुकेश चावला आदी उपस्थित होते.

Web Title: LBT issue merchants built statewide Moat