खरसुंडी रस्त्यावर वाळू तस्करी करणारा ट्रक जप्त; 'LCB'ची कारवाई

पोलिसांसह आता महसूल विभागानेही गौणखनिज तस्करीवर करडी नजर ठवेली आहे.
खरसुंडी रस्त्यावर वाळू तस्करी करणारा ट्रक जप्त; 'LCB'ची कारवाई
Summary

पोलिसांसह आता महसूल विभागानेही गौणखनिज तस्करीवर करडी नजर ठवेली आहे.

सांगली : आटपाडीतील खरसुंडी रस्त्यावर वाळूची तस्करी करणाऱ्या एक ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केला. तीन ब्रास वाळू आणि ट्रक असा १५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, याप्रकरणी दुर्योधन बाळासो गायकवाड (वय २७, रा. शेटफळे, ता. आटपाडी) यास अटक केली.

अधिक माहिती अशी, की वाळूसह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली आहेत. पथकातील पोलिस आटपाडी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी खरसुंडी ते कामत रस्त्यावर एकजण वाळूची चोरी करून ट्रकने जात असल्याची गोपनीय माहिती उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. संशयित गायकवाड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील ट्रक आणि तीन ब्रास वाळू जप्त करण्यात आली. कारवाईत उपनिरीक्षक दिलीप ढेरे, सहायक फौजदार अच्युत सूर्यवंशी, संदीप गुरव, राहुल जाधव, सागर टिंगरे, अनिल कोळेकर यांचा सहभाग आहे. पोलिसांसह आता महसूल विभागानेही गौणखनिज तस्करीवर करडी नजर ठवेली आहे.

खरसुंडी रस्त्यावर वाळू तस्करी करणारा ट्रक जप्त; 'LCB'ची कारवाई
महापालिकेची पोटनिवडणूक स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com