
सांगली: सांगलीसह कोल्हापूर आणि कर्नाटकातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गजाआड केले. संशयितांकडून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आठ गुन्हे उघडकीस आले. सूरज उमेश ओमासे (वय १९), ओंकार महेश तांदळे (२१, बेडग, ता. मिरज), योगेश विजय मिरजे (२३, मारुती मंदिरजवळ, आरग), वैभव प्रकाश रोमन (२९, रेल्वे स्टेशनजवळ, आरग, ता. मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.