पारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी लोणी हवेली ग्रामस्थांना दिले.

सध्या सकळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास नगर-पारनेर ही बस लोणी हवेली येथे येते. मात्र सदर बस ही आधीच्या गावांमधे पूर्ण भरुन येत असल्याने लोणी हवेली येथे थांबत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेकदा शाळा, महाविद्यालयात गैरहजर रहावे लागते.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडावी या मागणी साठी पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या नेतत्वाखाली लोणीहवेलीच्या ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांची भेट घेतली.लोणी हवेलीच्या सरपंच मनिषा कोल्हे, उपसरपंच संजय कोल्हे, हरीभाऊ जाधव, हरीभाऊ कोल्हे, बाजीराव दुधाडे, संभाजी थोरे, युवराज कोल्हे, बंटी दाते, दीपक जगताप, शंकर कोल्हे यावेळी उपस्थित होते.

पारनेर ते लोणी हवेली या पाच किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एसटी बसचे नुकसान होते. अपघाताची शक्यताही आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा विचार आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गाड्या सुरू आहेत. लोणी हवेलीच्या ग्रामस्थांनी रस्ता दुरूस्ती साठी प्रयत्न करावेत असे  भोपळे यांनी सांगितले.

पारनेर-लोणीहवेली हा रस्ता देखभाल, दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे आहे. मात्र रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी नाही. हा पूर्ण रस्ता नवीन करावा लागणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळणे आवश्यक असल्याचे पारनेर पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने सहकार्य केले तर रोजगार हमी योजनेतून या रस्त्याची दुरूस्ती करता येईल असे श्री झावरे म्हणाले.

Web Title: Leaving a separate bus for students in Parner