वाटेगावमध्ये बिबट्याचा रेडीवर हल्ला

वाटेगावमध्ये बिबट्याचा रेडीवर हल्ला

नेर्ले - वाटेगाव (ता. वाळवा) येथील शिंगारे वड्याजवळच्या बिबट्याने गोठ्यावर हल्ला करत रेडी फस्त केली. शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांच्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. श्री. साळुंखे हे सकाळी सात वाजता शेतावर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिबट्याने रात्री  जनावरांच्या शेडमध्ये घुसत रेडीला बाहेर ओढले. शेजारी असणाऱ्या ऊसात नेऊन रेडीवर ताव मारला. पोट भरल्यानंतर बिबट्याने अधर्वट खाल्लेली रेडी तेथेच सोडून दिली. 

याबाबत श्री. साळुंखे यांनी कासेगाव पोलीस ठाणे, तसेच शिराळा वनक्षेत्रपाल टी. बी. मुळीक यांना याबाबत माहिती दिली. बांबवडे, गिरजवडे या परिसरात रात्री साडे अकरानंतर बिबट्याला पहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कराड तालुक्यातील कासार शिरबे, सातदरा याठिकाणी बिबट्याची कुटुंबे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.  गेल्या दोन ते तीन वर्षापासून कराड आणि वाळवा तालुक्यात त्यांचा वावर आहे. बिबट्याने खाल्लेल्या रेडीचा पंचनामा करण्यात आला आहे. ऑनलाइन फॉर्म भरून नुकसान भरपाई साळुंखे यांना दिली जाईल, असे श्री मुळीक यांनी सांगितले.

सुरुवातीला तरसाने खाल्ले की बिबट्याने याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु वनाधिकारी पोहोचल्यानंतर पंचनामा केला असता रेडी बिबट्याने फस्त केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बाबासाहेब पाटील, सचिन बर्डे, डॉ. कोकरे उपस्थित होते

कराड व वाळवा हद्दीत बिबट्या गोठ्यामध्ये घुसून शेळ्या, मेंढ्या खाऊन जातो. भुकेमुळे जनावरांचा शोध बिबट्या घेताे. बिबट्या सतत जागा बदलतो. बिबट्याला पकडण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत
- टी. बी. मुळीक,
वनक्षेत्रपाल, शिराळा परीक्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com