वाहनाच्या जोरदार धडकेत बिबट्या जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 January 2021

कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा बिबट्या जागीच ठार झाला.

इटकरे (सांगली) : महामार्गावरील इटकरे फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली. या घटनेची माहिती महामार्ग परिसरातील नागरिकांनी कुरळप पोलिसांना दिली. बिबट्या मादी असून सर्वसाधारण तीन वर्षे वय असावे. रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा बिबट्या जागीच ठार झाला. पोलिस व वन अधिकारी घटनास्थळी आले. वन अधिकारी आर. ए. पाटोळे व सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. 

हेही वाचा - वेश्‍यांच्या कमाईवर जगण्याचा राजरोस उद्योग -

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard dead in accident in itkare sangli