नगर: बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

सनी सोनावळे
सोमवार, 14 मे 2018

कान्हूरपठार येथील पारनेर रस्त्यावरील मुक्तीधामजवळील सतीश ठुबे यांच्या खाजगी क्षेत्रात अंदाजे सहा महिन्यांचा बिबट्याचा बछडा काही ग्रामस्थांना मृत अवस्थेत आढळला. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी वनविभागास कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे वनरक्षक आकाश कोळे, दादाराम तिकोणे, रमेश घोरपडे आदी दाखल झाले.

टाकळी ढोकेश्वर : कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे आज दुपारी येथील मुक्तीधामजवळील खासगी क्षेत्रात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. दरम्यान, पारनेरच्या वनविभागास या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्यासमवेत येथे दाखल झाले. 

कान्हूरपठार येथील पारनेर रस्त्यावरील मुक्तीधामजवळील सतीश ठुबे यांच्या खाजगी क्षेत्रात अंदाजे सहा महिन्यांचा बिबट्याचा बछडा काही ग्रामस्थांना मृत अवस्थेत आढळला. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी वनविभागास कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे वनरक्षक आकाश कोळे, दादाराम तिकोणे, रमेश घोरपडे आदी दाखल झाले. यावेळी मृत बिबट्याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता सुमारे दोन दिवसांपुर्वी काही कारणाने बिबट्या मृत झाला असावा. मृत बिबट्या सडल्याने शवविच्छेदनासाठी घेऊन जाणे शक्य नसल्याने जागेवरच डाॅक्टरांकडून शवविच्छेदन करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

दरम्यान, या परिसरात मृत बिबट्या आढळल्याने या परिसरात अजुनही बिबटे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतात जाणे रात्री घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी यावेळी सुरज नवले व ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

Web Title: leopard died in nagar

टॅग्स