भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या 70 फुट खोल विहीरीत पडला

आनंद गायकवाड
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आश्वी( जि. अहमदनगर ) : संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ शिवारात मंडवदार परिसरातील येथील कुंडलिक दुधवडे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 37 मधील सुमारे 70 फुट खोल विहीरीत भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या रात्री पडला होता.

विहीरीतून येणाऱ्या डरकाळ्यांच्या आवाजाने बिबट्या पडल्याचे शेतमालकाला समजले. या घटनेची माहिती पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी वनविभागाला कळविल्याने, संगमनेर भाग 1 चे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. बी. माने व त्यांचे सहकारी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत आहेत. बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली असून, त्यामुळे रेस्क्यू करण्यास अडथळे येत आहेत

Web Title: The leopard fell into a 70-foot deep well