पारनेर: जामगावमध्ये आढळले बिबट्याचे दोन बछडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोनही बछड्यांना ताब्यात घेवून जीवदान दिले. यावेळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरात रानटी डुक्करांनी शेतपिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने रानटी डुक्कर व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पारनेर : तालुक्यातील जामगाव येथे दोन बिबट्याचे बछडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. कवडेश्वर डोंगरावरील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या शेतातही पिल्ले शनिवारी सकाळी आढळले. त्यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून बछड्यांना जीवदान दिले.

जामगावपासून तीन किमी अंतरावरील कवडेश्वर डोंगरावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांचे शेत आहे. या परिसरात गेल्या महिनाभरापासून रानटी डुकराने हैदोस घातला असून वाटाण्याचे पिकांचे नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेताभोवती तारीचे व जाळीचे कुंपण लावले आहे. माळी यांच्या वाटाण्याच्या शेताभोवती लावलेल्या कुंपणाच्या जाळीभोवती सकाळी दोन बछडे दशरथ माळी यांना आढळले. त्यांनी चुलते बाळासाहेब माळी यांना माहिती दिली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोनही बछड्यांना ताब्यात घेवून जीवदान दिले. यावेळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरात रानटी डुक्करांनी शेतपिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने रानटी डुक्कर व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: leopard found in Jamner