
या परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याचे चित्र आहे.
शिराळा (सांगली) : अंत्री खुर्द-वाकुर्डे खुर्द या मुख्य रस्त्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास बिबट्याने ठाण मांडले होते. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला, तसेच नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे. या परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याचे चित्र आहे.
या रस्त्यावर मोरणानगर वस्ती आहे. याठिकाणी हा बिबट्या रस्त्यावरच बसला होता. या रस्त्याच्या कडेलाच वस्ती आहे. येथील घराबाहेर अंगणात पंधरा-वीस कोंबड्या फिरत होत्या, त्याचे भक्ष्य टिपण्यासाठी बिबट्या बसला असावा, अशी चर्चा आहे. दरम्यान, वाहनातून आलेल्या लोकांनी या बिबट्याचा व्हिडिओ काढून त्यास हुसकावून लावले. याचबरोबर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरातील नागरिकांनाही सावध केले. यापूर्वी निरगिलीच्या झाडावर बिबट्या आढळून आला होता. एक बिबट्या व दोन बछडे लोकांना येथील परिसरात आढळून येत आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले.
हेही वाचा - कागल येथील आपले दुकान बंद करून शंकरवाडीकडे जात असताना ही घटना घडली
संपादन - स्नेहल कदम