leopard Paw Prints Found
sakal
सांगली - शहरातील वानलेसवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोरून काल मध्यरात्री बिबट्या फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी ही बाब वनविभाग आणि स्थानिक पोलिसांना कळवली. त्यांनी तत्काळ धाव घेत शोधमोहीम सुरू केली. कुंभारमळा परिसरासह अन्य काही भागात त्याच्या पायाचे ठसे मिळून आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, परिसरात घबराट पसरली असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले.