Leopard Sterilization : बिबट्यांची प्रजनन क्षमता कमी करावी, नसबंदीसारखा पर्याय राबवावा; जयंत पाटलांची मागणी

मंत्रालयात बैठक ; चांदोलीत अन्नसाखळी भक्कम करण्याची सूचना
Leopard Sterilization
Leopard SterilizationEsakal
Updated on

सांगली : बिबट्यांनी चांदोली जंगलातील आपला अधिवास सोडला आहे. ते मानवी वस्तीत शिरले आहेत. ऊस, कुरणांत त्यांनी घर केले आहे. त्यांच्याकडून माणसावर हल्ले होत आहेत. शेतकरी भयभीत आहेत. त्यावर उपाय शोधावाच लागेल.

बिबट्यांची प्रजनन क्षमता कमी करावी, नसबंदीसारखा पर्याय राबवावा. चांदोली जंगलात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवून अन्नसाखळी मजबूत करावी लागेल, अशी अत्यंत महत्त्वाची चर्चा आज मुंबईत मंत्रालयात करण्यात आली.

Leopard Sterilization
Sangli Crime : पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चार जणांना अटक

नमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या दालनात ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अनिल बाबर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्यावर्षी अधिवेशनात यावर चर्चा झाली होती. त्यावर काय उपाययोजना झाल्या, याची माहिती घेण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी ही बैठक घेतली होती.

या संपूर्ण विषयावर राज्याच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी चांदोली जंगल, पंचक्रोशी आणि बिबट्या दिसून आलेल्या भागात जावून अभ्यास करावा. त्यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

Leopard Sterilization
Sangli News : ऊस उत्पादकांत नाराजी; उत्पादन खर्च मणभर, एफआरपी वाढ कणभर

नसबंदीला हवी केंद्राची मान्यता

बिबट्यांची नसबंदी करणे हा राज्याच्या अधिकारातला विषय नाही, असे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी कायदा बदलावा लागेल आणि हा विषय केंद्र सरकारचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याबाबाबत केंद्र सरकारकडे मार्गदर्शन मागवावे, असे ठरवले.

आधुनिक, पुरेसे पिंजरे

खरेदी करावेत - नाईक

Leopard Sterilization
Sangli ED action : जयंत पाटील यांचा संबंध नाही, ED प्रकरणी बॅकेचे स्पष्टीकरण

बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बिबट्या दिसलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पोहोचणे गरजेचे आहे, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मांडले. त्यासाठी आधुनिक आणि पुरेसे पिंजरे खरेदी करावेत, पिंजरे वजनाला हलके असावेत, बिबट्या पकडल्यानंतर त्याला मध्य जंगलात सोडावे, अशा सूचना केल्या.

शिराळा येथील वन विभागाचे कार्यालय कऱ्हाड येथे हलवण्यास त्यांनी स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला. लोकांनी तक्रार घेऊन कऱ्हाडला जावे का, असा सवाल त्यांनी केला. शिराळा, वाळवा भागात मानवी वस्तीपर्यंत बिबट्यांचा शिरकाव झाला आहे.

लोकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी द्यायला जाता येत नाही. लोक भयभीत आहेत. बिबट्यांना पकडून जंगलात सोडता येईल का? त्यांना जंगलात योग्य आहार मिळावा यासाठी काय करता येईल, प्रजनन क्षमता कमी करता येईल, अशा सूचना मांडल्या आहेत.’’

- जयंत पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com