Sangli Crime
Sangli CrimeSakal

Sangli Crime : पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चार जणांना अटक

घरी जात असताना मोटरसायकल वरील एका अनोळखी इसमाने त्यांच्या आडवी गाडी मारली व त्याचदरम्यान पाठीमागील एका अनोळखी इसमाने पिशवी काढून घेऊन ते दोघे मोटरसायकलवरून पळून गेले.

इस्लामपूर - बँकेच्या समोरून नागरिकांच्या पैशाची बॅग बळवणाऱ्या ओडिसामधील आंतरराज्य टोळीतील चार जणांना इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. बॅग व चेन स्नॅचिंगसारख्या आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

Sangli Crime
Mumbai Crime : महिलांना अश्लील संदेश पाठवणारा सराईत बदमाश अटकेत

नानी सिबा नागरोळ (वय ४०) एम. रायडू (वय २०), संतोष रामू औल (वय २५, तिघेही रा. पाकलापल्ली, असका, जिल्हा गंजम, राज्य ओडिसा) व रोहित गोपाल प्रधान (वय २२, रा. कलिंकनगर, मंत्र्याळ, जिल्हा झांजपूररोड, राज्य ओडिसा) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील ४ लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १० जुलै २०२३ला सकाळी ११ वाजता सुभाष गोपाळ पाटील (रा. शाहूनगर, इस्लामपूर) हे येथील आझाद चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या इस्लामपूर शाखेतून ५० हजार रुपये रक्कम काढून बाहेर आले. कापडी पिशवीत ती रक्कम गुंडाळून सायकलच्या कॅरेजला लावली.

Sangli Crime
Mumbai : धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

घरी जात असताना मोटरसायकल वरील एका अनोळखी इसमाने त्यांच्या आडवी गाडी मारली व त्याचदरम्यान पाठीमागील एका अनोळखी इसमाने पिशवी काढून घेऊन ते दोघे मोटरसायकलवरून पळून गेले. सुभाष पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली होती.

त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण पथकाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, अरुण पाटील, सजन पाटील, गणेश वाघ, दीपक पाटील, प्रशांत देसाई, अलमगीर लतीफ, सतीश खोत, अभिजीत पाटील या दहा जणांच्या पथकाने पाठपुरावा केला.

Sangli Crime
Mumbai News : पोहायला गेली अन् विपरीत घडलं; मुंबईच्या मालाड बीचवर 3 मुले बुडाली

या तपासात हे चोरटे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतील पेठवडगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली. या चारही जण जणांनी सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यातील कबुली दिली आहे.

या चौघांच्यावर यापूर्वी इस्लामपूर, शिराळा, कागल तसेच कोडोली पोलीस ठाण्यांमध्ये अशा स्वरूपाच्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून एकूण ८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३, शिराळा, कोडोली, गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी १ तसेच कागल येथील २ गुन्ह्यांचा समावेश आहे.

Sangli Crime
Mumbai : धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

त्यांच्याकडील ४ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडील दोन पल्सर गाड्या, तीन मोबाईल, रोख रक्कम एक लाख ३० हजार तसेच तेलंगणामधील एकाचे डेबिट कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहे.

Sangli Crime
Mumbai : धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

ओडिसा येथील हे चौघेही चोर पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. गेले सात महिने ते येथे राहतात. शेजारच्या एका कंपनीत कामाला जात असल्याचा बनाव त्यांनी केला होता.

फेब्रुवारी महिन्यात इस्लामपूरमध्ये अशाच प्रकारची चोरी झाली होती. तेव्हापासून त्यांचा या परिसरात वावर असल्याचा संशय आहे. यावरून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या चोऱ्या एकाच प्रकारच्या आहेत. इचलकरंजी, हातकणंगले, वडगाव तसेच इस्लामपूर या भागातील आणखी काही चोऱ्या उघडकीला येतील, असे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

समान वाटप!

चौघांत दोन गाड्या होत्या. दोघे-दोघे मिळून चोऱ्या करत. दिवसभरात कोणत्याही प्रकारची चोरी केल्यानंतर त्यातून मिळणारा ऐवज हा रात्री खोलीवर एकत्र आल्यावर त्याचा चौघांमध्ये समान हिस्सा करून वितरित केला जात होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे एकत्रच राहिले आहेत, त्यांची मैत्री टिकून राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com