बेळगावकरांची झोप उडाली; गोल्फ मैदान परिसरात बिबट्याचे वास्तव्य

बिबट्याचा फोटो आज दुपारी १२ वाजता वनखात्याच्यावतीने अधिकृतरित्या प्रसिध्द
Leopard
Leopardsakal

बेळगाव - गेल्या पाच दिवसापासून बेळगावकरांची झोप उडवून दिलेल्या बिबट्याचे वास्तव गोल्फ मैदान परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, गोल्फ मैदान परिसरातील झाडावर लावण्यात एका ट्रॅप कॅमेऱ्यात सोमवार (ता. ८) रात्री बिबट्याची छबी कैद झाली आहे. बिबट्याचा फोटो आज दुपारी १२ वाजता वनखात्याच्यावतीने अधिकृतरित्या प्रसिध्दीस देण्यात आला.

जाधवनगर येथे एका बांधकाम कामगारावर हल्ला करुन झाडीझुडपात लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याने चकवा दिला आहे. बिबट्याच्या वावरामुळे जाधवनगर व परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे. बिबट्याल जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जाधवनगर येथील बिबट्या गोल्फ मैदान परिसरातील झाडीमध्ये शिरला असावा या शक्यतेने तेथील झाडावर सोळा ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सात ठिकाणी पिंजरे बसविण्यात आले आहेत. चार दिवस अथक प्रयत्न करुनही बिबट्या कोठेच आढळून आला नाही. मात्र, खबरदीरी म्हणून परिसरातील आकरा शाळाना सुट्टी देण्यात आली आहे.

वनखात्याचे ५० हून अधिक कर्मचारी सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत. संततधार पावसामुळे शोधमोहिम राबविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच एका कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याचा फोटो सोशल मिडयावर व्हायरल करण्यात आला होता. पण, त्याला वनखात्याने दुजोरा दिला नाही. आज सकाळी ट्रॅप कॅमेरे तपासून पाहण्यात आले त्यावेळी बिबट्याच्या छबी एका कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बिबट्याचे वास्तव गोल्फ मैदान परिसरातच असल्याचे स्पष्ट झाल्याने वनखाते आता आणखीनच सतर्क झाले आहे. पिंजऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. बिबट्याचा वावर गोल्फ मैदान परिसरातच असल्याने नागरिकामध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोल्फ मैदानपरिरातील ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याची छबी कैद झाली आहे. त्यामुळे गोल्फ मैदानाला त्याने आपले घर बनविले आहे. खबरदारीच्या दृष्टीकोणातून या परिसरात कोणीही मॉर्नींग वॉक किंवा इतर कारनास्तव येऊ नये. बिबट्या जेरबंद होईपर्यंत नागरिकानी वनखात्याला सहकार्य करावे.

- एच. एस. ॲथोंनी, डीसीएफ बेळगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com