फ्लॅटचे भाव खाली येण्याची शक्‍यता कमी

शिवाजी यादव
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

क्रेडाई संस्थेचे विद्यानंद बेडेकर - बांधकाम क्षेत्रात वेट ॲण्ड वॉचची भूमिका
कोल्हापूर - ‘‘पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. फ्लॅटच्या किमती कमी-जास्त होतील, असा अंदाज करून बांधकाम प्रकल्पात घाईघाईने कुठेतरी फ्लॅट घेऊन अनामत रक्कम गुंतवून बसणे हे नोटांच्या परिणामामुळे तो प्रकल्प वेळेत पूर्ण नाही झाला तर पश्‍चात्ताप सोसावा लागण्यापेक्षा तूर्त ‘वेट ॲण्ड वॉच’ अशी भूमिका बांधकाम व्यावसायिकांपासून फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत घेतली जात आहे.’’ असे मत क्रेडाई संस्थेचे सचिव विद्यानंद बेडेकर यांनी व्यक्त केले. 

कागदोपत्री एक-दोन लाखाची जमीन प्रत्यक्षात सात आठ लाखाला खरेदी करायची आणि त्यावर टोलेजंग बांधकाम प्रकल्प उभारून एक फ्लॅट किमान १५ ते २० लाखांच्या पुढे ते ५० लाखांच्या घरात जाऊन विकायचा, अशा प्रकारात सर्वसामान्यांना फ्लॅट खरेदी किमती आवाक्‍याबाहेर गेल्या. कोट्यवधीची गुंतवणूक या निमित्ताने बांधकाम क्षेत्रात होऊ लागली. 

पाचशे व एक हजारांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे कागदोपत्री जी रक्कम नोंद आहे. त्याच किमतीत जमीन खरेदी करावी लागेल, त्यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील अनधिकृत रक्कम घेण्यावर गंडातर आले. त्यातून फ्लॅटच्या किमती कमी येतील, असा सरसकट अंदाज करून काही घर घेणारे इच्छुक सुखावले, तर ज्यांनी नुकतेच घर घेतले, असा वर्ग महिन्याकाठी हजारो रुपयांचा हप्त्यांचा भार घेतला, या चिंतेत आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर क्रेडाईशी संवाद साधला असता श्री. बेडेकर म्हणाले, की कोल्हापूर शहरातील रेडीरेकनरचे दर त्या तुलनेत फ्लॅट खरेदी-विक्रीचे दर थोड्या फारफरकाने सारखेच आहेत. त्यामुळे पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे फ्लॅटच्या किमती फारशा कमी येण्याची शक्‍यता नाही; पण जिथे उच्च आलिशान दर्जाचे फ्लॅट आहेत, ज्यांच्या किमती ८० लाखांच्या पुढे म्हणजे किमान एक कोटीच्या पुढे आहेत. तिथे कागदोपत्री रक्कम एक असते, ऑनने द्यावी लागणारी रक्कम काही अंशी जास्त असते, अशा व्यवहारांना मात्र बहुतांशी चाप बसणार आहे, तसे पाहिले तर कोल्हापुरात ८० लाखांच्या पुढे फ्लॅटच्या किमती असणे किंबहूना असे फ्लॅट असण्याचे प्रमाण अगदीच नगन्य आहे. उर्वरित फ्लॅट हे रेडीरेकनरच्या दराशी मिळते जुळते आहेत. त्यानुसार इथे होणाऱ्या फ्लॅट खरेदी-विक्रीवर काहीही परिणाम होणार नाही. श्री. बेडेकर म्हणाले, ‘‘पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्द झाल्या त्याचा एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला घर अशी संकल्पना राबविण्याची घोषणा केली आहे. त्या नोटा बदलीनंतर बॅंकांकडे कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे भविष्यात व्याजाचे दर कमी येण्याची शक्‍यता वाढली आहे, असा व्याज दर कमी आला तर कर्जाचे हप्ते कमी होऊन त्यातून सर्वसामान्याला कर्ज घेऊन फ्लॅट घेणेही शक्‍य होईल, असे दिसते, मात्र सध्या नियमित व्यवहारांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही.’’

सरकारी धोरणाकडे लक्ष
कोल्हापुरात जवळपास ५०० ते १ हजारांवर फ्लॅट विक्रीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातील ३० ते ४५ लाखांच्या आसपासचे दर असलेल्या फ्लॅट विक्रीला सध्या फारशी अडचण नाही. त्यामुळे असे व्यवहार होऊ शकतात; मात्र अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार,  सरकार काय निर्णय घेते, याबाबत सर्वच पातळ्यांवर उत्सुकता असून, त्यामुळे निर्णय घेताना थोडे थांबलेले आहेत, असेही श्री. बेडेकर यांनी सांगितले.

Web Title: Less likely to come down to the flat rate