अण्णा हजारेंचे पंतप्रधान कार्यालयाला स्मरणपत्र

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 6 जुलै 2018

राळेगणसिद्धी (नगर) : स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, शेतीमाल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शितगृह उभारावीत, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकाय़ुक्ताची नेमणुक करावी या आणि इतर मागण्यासाठी मी आपणास या पूर्वी दोन पत्रे पाठवली आहेत अता हे तिसरे स्मरण पत्र पाठवत आहे. या बाबत ठोस कारवाई झाली नाही तर दोन ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

हजारे यांनी अशा अशयाचे स्मरणपत्र आज ( ता. 5 ) प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना पाठविले असून या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या आहेत. या पत्रात हजारे यांनी वरील मागण्यांबाबत आपण निवडणुक काळात जनतेला अश्वासन दिले होते. आम्ही सत्तेवर आल्यावर  लोकपाल व लोकायुक्त तात्काळ आमलात आणू व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीही लागू करू मात्र आपण सत्तेवर येऊन चार वर्षे लोटली तरीही काहीच कारवाई झाली नाही.

पत्रात पुढे म्हटले आहे की,  मी 23 मार्चला दिल्ली येथील रामलिला मैदानावर बेमुदत उपोषण केले त्या वेळीही आपण या मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असे सांगितले त्यामुळे मी आंदोलन मागे घेतले होते. मात्र तीन महिने लोटले तरी अद्यापही आपण कोणतीही कार्यवाही केली नाही. मी या पुर्वी दोन पत्रे पाठवली त्या पत्रांनाही आपण फक्त आपले पत्र मिळाले एवढेच उत्तर दिले आहे. आता हे तिसरे स्मरण पत्र देत आहे. जर आपण आमच्या मागण्यांबाबत व निवडणुक काळात जनतेला दिलेल्या अश्वासनाबाबत येत्या दोन ऑक्टबर पर्यंत योग्य असा ठोस निर्णय घेतला नाही तर मी राळेगणसिद्धी येथे दोन ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे.

Web Title: letter to prime minister office from anna hajare