पाच वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी दोषीला जन्मठेप

चंद्रकांत देवकते
शनिवार, 1 डिसेंबर 2018

याबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहीतीनुसार संगीता ईश्वर वंजारी मुळ गाव गोंदया हिचे शिवाजी भागवत भालेराव वय ३२ रा चिंचोली काटी याचे प्रेमसंबंध होते. संगीता हिस पाच वर्षाची आरोषी नावाची मुलगी होती.  संगीता व शिवाजी यांच्या प्रेमसंबंधामधे आरोषी ही अडथळा ठरत होती. दरम्यान २ डिसे.२०१४ रोजी संगीता हि कामाला गेली असता शिवाजी याने आरोषीला लाकडी बेलण्याने, भातवाडी व चाकूने डोक्यावर कपाळावर मारहाण करून तिचा खून केला होता..

मोहोळ जि. सोलापूर : प्रेयसी सोबत असलेल्या प्रेम संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या पाच वर्षीय मुलीच्या हत्तेप्रकरणी प्रियकराला जन्मठेप व एक हजार रूपयेच्या दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. शिवाजी भागवत भालेराव रा चिंचोली काटी असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहीतीनुसार संगीता ईश्वर वंजारी मुळ गाव गोंदया हिचे शिवाजी भागवत भालेराव वय ३२ रा चिंचोली काटी याचे प्रेमसंबंध होते. संगीता हिस पाच वर्षाची आरोषी नावाची मुलगी होती.  संगीता व शिवाजी यांच्या प्रेमसंबंधामधे आरोषी ही अडथळा ठरत होती. दरम्यान २ डिसे.२०१४ रोजी संगीता हि कामाला गेली असता शिवाजी याने आरोषीला लाकडी बेलण्याने, भातवाडी व चाकूने डोक्यावर कपाळावर मारहाण करून तिचा खून केला होता. या प्रकरणी संगीता हिने मोहोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार या गुन्हयात १२ साक्षीदार तपासण्यात आले. संगीता हिने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेला जबाब व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीकांत आणेकर यांनी शिवाजी भालेराव याला जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. यात तत्कालीन सपोनी धनाजी झळक यांनी तपास केला. सरकारच्या वतीने अॅड. पी एस जन्नू, कोर्टपैरवी म्हणून एन सी बिराजदार , आरोपीच्या वतीने अॅड. गडदे यांनी काम पाहीले.

Web Title: life imprisonment for murder case in Mohol