नवजात बालकाच्या खूनप्रकरणी आई व आजोबास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सोलापूर - अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाचा खून केल्याप्रकरणी आई अंजली वाघमोडे आणि आजोबा गोरख लवटे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी जन्मठेप व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोहोळ तालुक्‍यातील बेगमपूर व माचणूर येथील भीमा नदीच्या पात्रात 11 जुलै 2012 रोजी एक पुरुष जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक मृतावस्थेत आढळून आले होते. याबाबत कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मृत अर्भकाच्या हाताला रुग्णालयाचे लेबल मिळाले होते. त्यानुसार तपास करण्यात आला. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बालकाचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने अंजलीने गोरख लवटेच्या मदतीने मृतदेह भीमा नदीच्या पात्रात टाकून दिले असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील नीलेश जोशी यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. प्रकाश पवार, ऍड. हर्षवर्धन शिंदे यांनी साहाय्य केले. आरोपींतर्फे ऍड. धनंजय माने यांनी काम पाहिले.

Web Title: Life imprisonment punishment for Murder