जकातवाडीच्या युवकास खूनप्रकरणात जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

सातारा येथील राजधानी टॉवर्स परिसरातील कल्पना हॉटेलसमोर झालेल्या खूनप्रकरणी युवकास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

सातारा - येथील राजधानी टॉवर्स परिसरातील कल्पना हॉटेलसमोर झालेल्या खूनप्रकरणी युवकास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

प्रकाश रामचंद्र सणस (वय 34, रा. जकातवाडी, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत सागर सूर्यकांत अहिरे (वय 22, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) याने फिर्याद दिली होती. पाच फेब्रुवारी 2014 रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शंकर जांभळेस शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच धक्काबुक्की केल्यावरून प्रकाशने सागरचे वडील सूर्यकांत ऊर्फ सुरेश पांडुरंग अहिरे (वय 50, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यात गंभीर जखमी झाल्याने सूर्यकांत यांचा मृत्यू झाला. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश सावंत यांनी प्रकाशला जन्मठेप, 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

Web Title: Life imprisonment for youth in murder case