लोणीत सौरऊर्जेवरील पथदिवे प्रकाशमान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

शिर्डी : लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला. जिल्हा परिषदेतून चाळीस लाख रुपये खर्च करून मुख्य रस्त्यावर सौरदिवे प्रकाशमान करण्यात आले. पाणीयोजनेच्या विहिरीवर सौरपंप कार्यान्वित करण्यात आला. सौरऊर्जा वापरात या ग्रामपंचायतीने आघाडी घेतली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी केले. 

लोणी बुद्रुकच्या सौर प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, काशिनाथ विखे पाटील, सराफ सोपान मैड, सुभाष विखे, नंदकुमार राठी, सरपंच लक्ष्मण बनसोडे, लोणी खुर्दच्या सरपंच मनीषा आहेर उपस्थित होते. कृषी दिनानिमित्त उपस्थितांना विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले, तर ग्रामदैवत म्हसोबा मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. 

विखे पाटील म्हणाल्या, की ग्रामपंचायतीच्या सौर प्रकल्पातून निर्माण होणारी अतिरिक्त वीज महावितरणला विकली जाईल. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे. यापुढे सौरऊर्जेचे युग येणार आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Lighted on solar power