गोकुळमध्ये कशामुळे लोणी, दूधपावडर उत्पादनावर मर्यादा ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

राज्यात दैनंदिन दूधसंकलनात सुमारे ३० लाख लिटरची घट झाली आहे. महापुराच्या काळात अनेक गावांत पाणी घुसल्याने दुभत्या जनावरांना अन्यत्र हलवण्यात आले. काही गावांत दहा दिवसांपेक्षा जास्त जनावरे पाण्याने वेढलेल्या परिस्थितीत होती. पावसामुळे चाराटंचाईही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली.

कोल्हापूर - महापूर, अवकाळी पावसाचा फटका, त्यात बदललेले हवामान आणि त्यांमुळे दुभत्या जनावरांची बदललेली दिनचर्या याचा परिणाम दूधसंकलनावर झाला असून, दूधसंकलन घटल्याने दूध संघात दूधपावडर व लोणीउत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास उन्हाळ्यात लोणी व दूधपावडरचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. सर्वच दूध संघांसमोर उपपदार्थ उत्पादनाचे आव्हान यानिमित्ताने उभे राहिले आहे. 

राज्यात दैनंदिन दूधसंकलनात सुमारे ३० लाख लिटरची घट झाली आहे. महापुराच्या काळात अनेक गावांत पाणी घुसल्याने दुभत्या जनावरांना अन्यत्र हलवण्यात आले. काही गावांत दहा दिवसांपेक्षा जास्त जनावरे पाण्याने वेढलेल्या परिस्थितीत होती. पावसामुळे चाराटंचाईही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. या सगळ्यांचा परिणाम दुभत्या जनावरांच्या दिनचर्येवर झाला, त्यातून त्यांचे दूधउत्पादनच घटले आहे. राज्यातील सर्वच संघांत हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

हेही वाचा - अबब ! गोकुळचे दुध संकलन दोन लाखांनी घटले 

दुधापासूनच जास्तीत जास्त उपपदार्थ

संघाकडून म्हशींचे संकलित होणारे सर्वच दूध पिशवीबंद करून विकले जाते. या दुधालाच बाजारात जास्त मागणीही आहे आणि संघांनाही या विक्रीतून मोठा नफा मिळतो. गायीच्या दुधाला फारशी मागणी नसल्याने या दुधापासूनच जास्तीत जास्त उपपदार्थ तयार केले जातात; तथापि गायीच्या दुधाला दिला जाणारा खरेदी दर आणि त्यातून मिळणारे उत्पादन यांत मोठी तफावत आहे. म्हशीपेक्षा गाय संगोपनास कमी खर्च येत असल्याने उत्पादकांनी म्हशीचे दूध कमी करून गाय दूध वाढवले आहे; पण त्याच वेळी संघांनी गायीचे दूध स्वीकारण्यावर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे गायीच्या दुधापासून लोणी व दूधपावडर उत्पादन करणे काही संघांनी बंदच केले आहे. म्हशीचे साडेसात फॅटचे दूध साडेसहा करून ते पिशवीबंद करून विकताना जी प्रक्रिया करावी लागते, त्यातून लोणी व दूधपावडर उत्पादन फारच कमी होते. परिणामी मागणीच्या तुलनेत या दोन्हीही उपपदार्थांचे उत्पादन घटले आहे. 

हेही वाचा - बेळगावातील ‘त्या’ एन्काउंटरची आठवण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Limit On Butter Milk Powder Production In Gokul