'जात पडताळणी'कडे जाणार विजयी उमेदवारांची यादी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

सोलापूर - जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिका, नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीत राखीव जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांची नावे, यादी जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात येणार आहे. वैधता प्रमाणपत्र नसलेल्यांनी प्रमाणपत्रांसाठी अर्ज दिल्याची पोचपावती उमेदवारी अर्जासोबत देणे बंधनकारक आहे. तसा आदेश नगर विकास विभागाने दिला आहे.

महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर ते सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रवर्गातील जे उमेदवार निवडून येतील, त्यांनी सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येते. महापौर आणि नगराध्यक्षांसाठीही याच पद्धतीने तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीसंदर्भात उच्च न्यायालयाने सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी, आयुक्तांवर जबाबदारी
सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांची नावे जात पडताळणी समितीकडे वेळेत पाठविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: list of candidates being elected to be caste cheaking