
शिराळा : शिराळा येथे बाजार समितीतर्फे भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारास शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या बाजारात सुमारे १७ लाखांची उलाढाल झाली आहे. शिराळा येथे गेले सव्वा महिन्यापासून जनावरांच्या बाजारास सुरुवात झाली आहे. सव्वा महिन्यात पाच लाखांपासून २५ लाखांपर्यंत उलाढाल वाढू लागली आहे.