esakal | खुंटे वस्तीतील बेकायदेशीर गोठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

खुंटे वस्तीतील बेकायदेशीर गोठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

एका वाहनात लहान वासरे पाय बांधून भरलेली आढळून आली. तसेच पत्र्याच्या शेडमध्ये आठ लहान वासरे बांधल्याचे आढळले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे खरेदी- विक्रीच्या पावत्या, जनावरांच्या चारापाण्याची व वैद्यकीय व्यवस्था याबाबत विचारण केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या असल्याचे अधिक चौकशीत निष्पन्न झाले.

खुंटे वस्तीतील बेकायदेशीर गोठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : खुंटेवस्ती (ता. फलटण) येथील बेकायदेशीर जनावरांच्या गोठ्यावर कारवाई करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे दोन लाख रुपये किमतीची 56 वासरे, दोन बैल, चार गायी, तसेच आयशर व महिंद्रा पिकअप असा मुद्देमाल जप्त केला आहे. कत्तलीसाठी आणलेली जनावरे अनधिकृतपणे वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाहरूख जलील कुरेशी (वय 27) व सुहेल जलील कुरेशी (वय 20, रा. मंगळवार पेठ, फलटण), राजू हुसेन शेख (वय 18, निरावाघज, बारामती) या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार खुंटेवस्ती (फलटण) येथे ओढ्यालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या गायी, वासरे व बैल बांधण्यात आले असून, कत्तल करण्यासाठी त्यांची वाहतूक होणार असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ठिकाणी जाऊन तपासणी केली. या वेळी त्यांना शाहरूख जलील कुरेशी (वय 27) व सुहेल जलील कुरेशी (वय 20, रा. मंगळवार पेठ, फलटण), राजू हुसेन शेख (वय 18, निरावाघज, बारामती) हे तीन संशयित आयशर टेंपो (एमएच 25 यू 0915) मध्ये दोन बैल, चार गायी, 15 लहान वासरे पाय बांधून भरत होते, तसेच दुसऱ्या पिकअप गाडीत (एमएच 1 बीएल 8317) मध्ये 30 लहान वासरे पाय बांधून भरलेली आढळून आली, तसेच पत्र्याच्या शेडमध्ये आठ लहान वासरे बांधल्याचे आढळले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे खरेदी- विक्रीच्या पावत्या, जनावरांच्या चारापाण्याची व वैद्यकीय व्यवस्था याबाबत विचारण केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या असल्याचे अधिक चौकशीत निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी संबंधित दोन लाख रुपये किमतीची जनावरे जप्त करून ती सद्‌गुरू गोशाळ झिरपवाडी (ता. फलटण) येथे संगोपनासाठी ठेवली आहेत, तसेच तिघा संशयितांना फलटण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या तपासात डॉ. वाघ यांच्यासमवेत सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, उत्तम दबडे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, रवींद्र वाघमारे, संतोष जाधव, प्रवीण कडव, केतन शिंदे, धीरज महाडिक, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, संजय जाधव उपस्थित होते. 

वाचा : व्हॅलेंटाईन डे पुर्वीच त्याला जेलची हवा; गर्भ वाचला

हेही वाचा : राजेंना चीतपट करणाऱ्या पाटलांनी उलगडले यशाचे रहस्य

loading image