Video : राजेंना चीतपट करणाऱ्या पाटलांनी उलगडले यशाचे रहस्य

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जोपासणारा मतदारसंघ म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून खासदार श्रीनिवास पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लाेकसभा पाेटनिवडणुकीत विजय मिळविला. आज (मंगळवार) खासदार पाटील यांचा 79 वा वाढदिवस आहे. पाटील यांनी एका भाषणात तेव्हांपासून मला निवडून यायचा नाद लागल्याची मिस्कील टिप्पणी केली हाेती.
 

सातारा : लोक मला नेहमी एक प्रश्न विचारतात, "श्रीनिवास पाटील साहेब हे माजी जिल्हाधिकारी, आयुक्त होते, दोन वेळा कराड लोकसभेचे खासदार, सिक्कीमचे राज्यपाल आणि आता पुन्हा सातारा लोकसभेचे सदस्य आहेत. ते सासरे म्हणून कसे आहेत ?" आज मी जाहीरपणे या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छिते, माझ्यासाठी ते फक्त 'बाबा' आहेत जे घराबाहेर पडण्यापूर्वी मला विचारतात, "बेटा मैं बाजार जा रहा हूँ, कुछ लाना है बाजार से ?" माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत पाहिलेली सर्वात 'मोठी व्यक्ती'..! बाबा, हेच आहेत  अशी भावना खासदार श्रीनिवास पाटील यांची स्नुषा रचना सारंग पाटील यांना आज व्यक्त केली आहे.
 
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मारुल हवेली हे श्रीनिवास पाटील यांच मूळ गाव आहे. 11 फेब्रुवारी 1941 कलावधीत शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाटील हे लहानपणापासूनच लहान माेठ्या माणसांत मिसळत हाेते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास पाटील यांना लाभला. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर पाटील यांना यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ यांचे मार्गदर्शन मिळाले आणि पुढे जिल्हाधिकारी म्हणून निवडले गेले. त्यानंतर त्यांनी शिक्षण, प्रशासन, राजकारण, समाजकारणासह प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले. राज्यपाल म्हणून सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतरही जनमाणसात राहिले. सध्या ते सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. 

साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना चित केल्यानंतर पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षा झाला. एका भाषणात त्यांनी निवडणुकांमध्ये यशस्वी होण्यामागचे गुपीत सांगताना, ''महाविद्यालयात असताना 'हिरवळी' चा भक्कम पाठिंबा असल्याने मला जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून येत होतो, तेव्हापासूनच निवडून यायचा नाद लागला "अशी मिस्कीलपणे टिप्पणी केली हाेती.

हेही वाचा  उदयनराजेंना आव्हान देणारे श्रीनिवास पाटील आहेत कोण?

त्यांच्या 79 वा वाढदिवसा निमित्त सातारा जिल्हा ग्रंथालय संघचे जिल्हाध्यक्ष हणमंत जाधव यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. जाधव म्हणाले राजकीय पटलावर माझे वडील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक (कै.) जयसिंग जाधव नेहमी (कै.) पी. डी. पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार पाटील यांच्या सोबत आणि विचाराने कार्यरत राहिले. त्यामुळे खासदार पाटील यांचे खराडे गावी व घरी नेहमी येणे होते. माझ्या गावावर व लोकांवर त्यांचे प्रेम व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याला कारणही तसेच आहे. माझे वडील व चुलते (कै.) लालासाहेब जाधव हे त्यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. मावशीकडे उन्हाळ्याच्या सुटीत नेहमी येणं-जाणं होते.

त्या वेळी कृष्णा नदीमध्ये पोहल्याशिवाय दुपार सरत नव्हती, मग रानावनात मनसोक्त फिरायच, फडक्‍यात बांधून आणलेली भाकरी खायाची. संपूर्ण शिवार पाहायचं, त्यांना सामान्य शेतकऱ्याप्रमाणे राहण्याचा छंदच होता. प्रशासकीय सेवेत असतानाही गावाची नाळ त्यांनी कधी तोडली नव्हती. कॉलेज जीवनातील मित्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शब्दाखातर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. दीर्घकाळ शासकीय सेवेतील अनुभवाबरोबर कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली; परंतु त्यातही खासदार म्हणून उत्तम व प्रभावीपणे कार्य केले. ज्या गावात साहेब रानावनात अनवाणी हिंडले व फिरले त्याचं गावाचा लोकप्रतिनिधी या नात्याने विकासाच्या माध्यमातून कायापालट केला आहे. गावाला रस्ता नव्हता, तारगाव फाट्यापर्यंत उत्तम दर्जाचा रस्ता बनवला आहे. गावातील रेल्वे गेट सायंकाळी पाच वाजता बंद व्हायच ते पहाटे पाच वाजता सुरू व्हायचे. आता ते चोवीस तास खुले आहे.

गावच्या ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे आरसीसी मंडप उभारला आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे, यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाला पुस्तके भेट देऊन, वाचन चळवळ गतिमान केली आहे. गावातील स्वामी समर्थ वाचनालय व ग्रंथालयास पुस्तकरूपी मदत केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून या वर्षी यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामीण ग्रंथालय पुरस्काराने वाचनालयास सन्मानित केले आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा, यासाठी नेहमी ते अग्रेसर असतात. उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्वाला माणुसकीची जाणीव आहे. गरिबीचे, हलाखीचे दिवस माहिती आहेत. त्यांचे साधे राहणीमान व उच्च विचारसरणी आहे. नेहमी सकारात्मक व सातत्यपूर्व कार्यामुळे प्रत्येक विकासात्म काम करण्याची धडपड व तळमळ प्रचंड आहे. 

वाचा : आश्विनी बाळा, काळजी करु नकाेस देश तुझ्या पाठीशी आहे

हेही वाचा : अखेर डॅडींनीच केला त्याचा खून

हेही वाचा : Video : श्रीनिवास पाटील म्हणतात, अन् मला निवडून यायचा नाद लागला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrinivas Patil Shared Secret Of His Winning In Election