सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन... पालकमंत्र्यांची घोषणा... कधीपासून वाचा ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत निघालेल्या अखेर सांगली जिल्ह्यातील शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्ण जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली

सांगली ः कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत निघालेल्या अखेर सांगली जिल्ह्यातील शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्ण जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली आणि त्यात हा अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार बुधवार (ता. 22) रोजी रात्री 10 पासून ते 30 जुलै रोजी रात्री 10 पर्यंत महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती या ठिकाणी कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकांनी जनता कर्फ्यू पाळायचा आहे. जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्यमंत्री विश्‍वजीत कदम उपस्थित होते. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्य संख्यने 1 हजाराचा आकडा पार केला होता. 30 जून रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 385 होती. त्यात गेल्या 19 दिवसांत तब्बल सहाशेहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. सांगली, मिरज, कुपवाड या शहरांमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. आकडा तिनशेवर पोहचला आहे. या स्थितीत पालकमंत्री जयंत पाटील काय निर्णय घेतात आणि त्यांच्या भूमिकेला जिल्ह्यातील खासदार, आमदार कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले होते.

आज अखेर शहरी भागात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ग्रामीण भागात मात्र जनता कर्फ्यू असेल. तेथे बंदचा निर्णय स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून घेतला जाईल. शक्‍यतो या भागातही बंदच पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown again in sangli district