Lockdown: Former MP Dilip Gandhi criticizes collector
Lockdown: Former MP Dilip Gandhi criticizes collector

लॉकडाऊनः पीएला मारल्याने माजी खासदार गांधी जिल्हाधिकाऱ्यांवर चिडले, मात्र नगरकरांकडून कौतुक

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी खमकी भूमिका घेऊन काम करीत आहेत. कायद्याच्या आड येणाऱ्या व लॉकडाऊनच्या काळात नियम न पाळणाऱ्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांना ते कायदा शिकवत आहेत.

महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःला क्वॉरंटाइन केलं आहे. अशा स्थितीत नगरचे जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरून लोकांना दिलासा देत आहेत. आजही त्यांनी खमकी भूमिका घेत कारवाई केली. मात्र, या कारवाईने माजी खासदार दिलीप गांधी दुखावले आहेत. कारण त्यांच्या स्वीय सहायकावर त्यांनी कारवाई केली. सोशल मीडियात याचीच चर्चा रंगली आहे.

जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईचे लोकांकडून कौतुक होत आहे. मात्र, या कारवाईचा निषेध करीत गांधींनी पत्रक काढलं आहे.

त्यात ते म्हणतात, नगर शहरातील गरजू नागरिकांच्या घरी चांगले अन्न पोहचवण्याचे काम माझ्या वतीने सुरु आहे. शहरातील काही भागात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यासाठी मोफत सोडियम क्लोराईड केमिकल व टँकर उपलब्ध करून दिले आहे.

प्रशासनाला मदतीच्या भावनेनेच हे सामाजिक काम मी सुरु केले आहे. असे असतांना आज सकाळी हातमपुरा येथे माझ्या स्वीय सहाय्यक व ड्रायव्हरला गाडी अडवून पोलिसांनी मारहाण केली. माझा स्वीय सहाय्यक रोषन गांधी याने आम्ही अन्नदान करुन आता फवारणीसाठी सोडियम क्लोराईड आणण्यासाठी चाललो आहोत. तेथील पोलिसांनी दोघांना मारले.

मी फडणवीस यांच्या कानावर घातलंय

आज शहरात लॉकडाऊन असतांनाही शेकडोच्या संख्येने सामाजिक काम कण्यासाठी लोक गाड्यांमधून फिरत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाहीये. मात्र, माझ्याच लोकांवर कारवाई करून लगेच सोशल मीडियावर फोटो टाकून मला बदनाम करण्याची पोलिसांची व जिल्हाधीकारींची भूमिका योग्य नाही. या बाबत मी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती देऊन  नाराजी व्यक्त केली आहे, असे नाराजी माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी व्यक्त केली आहे.

माझा पीए सोडियम आणायला गेला होता
गांधी पुढे म्हणाले, नगर शहरात लॉकडाऊन असले तरी मेडिकलची दुकाने चालू, सर्व भागात भाजी बाजार चालू, किराणामालाचे दुकाने दिवसभर चालू असतात. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. असे असतांना माझा पीए व ड्रायव्हर शहरातील विविध भागात अन्नदान करून  केमिकलचे दुकान उघडे असल्यानेच फवारणीसाठी सोडियम क्लोराईड आणण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर केलेली कारवाई व मारहाणीला माझा आक्षेप आहे. सर्व भागात १४४ कलम लावण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारीच नियम पाळत नाहीत

स्वतः जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेल्या कारवाईचा मी निषेध करतो. लॉकडाऊन काळात ते स्वतः कोणतेही नियम पळतांना दिसत नाहीत. ज्या भागात पाहणी करण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या संखेने पोलीस व अधिकारी असतात. कोणताही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पळत नाहीत. तोंडाला मास्क लावत नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com