esakal | लॉकडाउन काळातील रेल्वे बुकींगचे पैसे परत मिळणार पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown period train bookings will be refunded

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउन काळातील आरक्षित झालेल्या तिकीटांचे पैसे सोमवारी (ता.25) पासून बेळगाव रेल्वे स्थानकावर दिले जात आहेत. यासाठी तिकीट काऊंटरवरच तिकीट काढलेले आवश्‍यक आहे. तर ऑनलाईन बुकींग केलेल्या तिकीटांचे पैसे ऑनलाईन जमा होणार आहेत.

लॉकडाउन काळातील रेल्वे बुकींगचे पैसे परत मिळणार पण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

 
बेळगावः कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउन काळातील आरक्षित झालेल्या तिकीटांचे पैसे सोमवारी (ता.25) पासून बेळगाव रेल्वे स्थानकावर दिले जात आहेत. यासाठी तिकीट काऊंटरवरच तिकीट काढलेले आवश्‍यक आहे. तर ऑनलाईन बुकींग केलेल्या तिकीटांचे पैसे ऑनलाईन जमा होणार असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. 
बेळगाव रेल्वे स्थानकावरून देशभारत रेल्वे गाड्या धावतात. या सर्व रेल्वे गाड्यांचे सुमारे सहा महिन्यांपर्यंत अगोदरच बुकींग केले जाते मात्र, सर्व रेल्वे 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउननंतर बंद करण्यात आल्या होत्या. या दरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या आरक्षित तिकीटांचे पूर्ण पैसे देण्याचे अश्‍वासन रेल्वे खात्याने यापूर्वीच दिली होते. त्यानुसार पैसे परत दिले जात आहेत. पैसे परत घेण्यासाठी तिकीटाच्या तारखेपासून पुढील सहा महिन्यापर्यंत ते कधीही परत मिळणार आहेत.

देशभरात सध्या मोजक्‍याच गाड्या धावत आहेत, मात्र धावत नसलेल्या गाड्यांचेही काहीजणांनी बुकींग केले आहे. यामुळे काही प्रवासी संभ्रमात पडले होते, त्यांनी रेल्वे स्थानकांशी संपर्क साधावा असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. 

बेळगाव रेल्वे स्थानकावरून प्रवाशांनी दिल्ली, मुंबई, पुणे, तिरुपती, राजस्थान आदी भागात जाणाऱ्या गाड्यांचे बुकींग केले होते, मात्र, रेल्वेगाड्याच रद्द झाल्यामुळे प्रवास करणे शक्‍य झाले नाही. यानंतर केंद्र शासनाने सर्वांच्या तिकाटाचे पूर्ण पैसे परत करण्याचे जाहीर केले होते. ज्यांनी ऑनलाईन बुकींग केले होते, त्यांची रक्‍कम ऑनलाईनद्वारेच परत मिळणार आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी गर्दी करू नये यासाठी याची मुदत सहा महिने केली आहे. नैऋ त्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या हुबळी विभागातील हुबळी, बेळगाव, बळ्ळारी, विजयपूर, धारवाड, होसपेट, वास्को-द-गामा या रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरवर तिकीटाचे पैसे परत दिले जात आहेत. 

रक्कम तिकीट काऊंटरवर मिळणार
देशभरातील रेल्वे सेवा 22 मार्च पासून बंदच होती. 22 मे पासून रेल्वे धावत आहे. या दरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकीटांची रक्कम नैऋत्य रेल्वेने सुरु केलेल्या तिकीट काऊंटरवर दिली जात आहे. ऑनलाईन बुकींग असेल त्यांची रक्‍कम ऑनलाईनद्वारेच जमा होणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी नैर्ऋत्य रेल्वेचे प्राणेश यांनी सांगितले.