esakal | Video : लॉकडाऊन ः बघा, आमदार आशुतोष काळेंच्या घरात काय चाललंय...

बोलून बातमी शोधा

Video: Lockdown: What is happening in the house of MLA Ashutosh Kale ...

लॉकडाऊन समस्येवर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी तोडगा काढला आहे. त्यांचे पती आशुतोष काळे हे कोपरगाव तालुक्याचे आमदार आहेत तर वडील चंद्रशेखर घुले पाटील हे शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार व मंत्री जयंत पाटील हे त्यांचे मामा. चैताली यांनी शोधलेला पर्याय पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना चांगलाच भावतो आहे.

Video : लॉकडाऊन ः बघा, आमदार आशुतोष काळेंच्या घरात काय चाललंय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर - कोरोनाबाणीमुळे आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. भाजी किंवा किराणा सामान घ्यायचंही मुश्कील झालंय. लोकं जागोजागी अडकून पडलीत. ही केवळ राष्ट्रीय आपत्तीच नाही तर हे मानव जातीवर आलेलं संकट आहे. या संकटावर प्रत्येकजणआपापल्या परीने मात करीत आहे. या संकटाचा सामना करता करता काही नवे पर्याय समोर आलेत. त्यातून चांगलंही काही घडतं आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वात मुश्कील काय असेल तर ते मुलांना घरात सांभाळणं. ज्या कुटुंबात छोटी मुलं आहेत, त्या कुटुंबातील पालकांची तर भंबेरी उडते आहे. त्या मुलांना किती वेळ समजून सांगणार आणि टीव्ही पाहायला तरी किती वेळ लावणार. त्यातून मुलं चिडचिड करतात. ही सार्वजनिक समस्या झाली आहे.

हेही वाचा - पारनेरच्या तहसीलदारबाईंनी ड्रायव्हरला मारलं

या समस्येवर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी तोडगा काढला आहे. त्यांचे पती आशुतोष काळे हे कोपरगाव तालुक्याचे आमदार आहेत तर वडील चंद्रशेखर घुले पाटील हे शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार व मंत्री जयंत पाटील हे त्यांचे मामा. चैताली यांनी शोधलेला पर्याय पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना चांगलाच भावतो आहे.

त्यांनी एक मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले आहे. त्या माध्यमातून पालकांंना मुलांचे विविध प्रकारचे खेळ घेता येतात. त्यातून अनायासे शिक्षणही होत आहे. अगदी मुलांना स्वयंपाक कसा करायचा किंवा त्याची प्रक्रिया काय असते, असे उत्सुकता वाढवणारे टास्कही त्यात आहेत. एक तर मुलांचे यातून शिक्षण होते आणि दुसरं म्हणजे त्यांचा वेळी कारणी लागतो.

या अॅपमुळे मुलांना आनंद मिळतो आहे. एक एप्रिलपासून त्याची सुरूवात झाली आहे. दररोज एक टास्क दिला जातो. आणि अॅपवर तो कम्प्लीट झाल्यावर अपलोड करायला सांगितले जाते. कोळपेवाडीसारख्या ग्रामीण भागातही या उपक्रमाचे कौतुक होत आहे. गौतम पब्लिक स्कूलमधील मुलं आनंदाने या अॅपमुळे वेळ घालवत आहेत.

कसा अभ्यास करतोय अयांश आशुतोष काळे

स्वतः चैताली या मुलगा अयांश याचा अभ्यास घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अयांश साडेतीन वर्षांचा आहे. एका पत्त्यांच्या कॅटद्वारे चैताली त्याचा अभ्यास घेताना दिसतात. तोही सगळे नंबर बरोबर ओळखताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे. लॉकडाऊनच्या स्थितीत अगदी सहजपणे घरात मिळणाऱ्या साहित्याद्वारे तुम्ही मुलांची करमणूक किंवा त्यांचा अभ्यास घेऊ शकता, असे चैताली काळे यांनी दैनिक सकाळला सांगितलं.

चैताली काळे यांना शिक्षण क्षेत्राविषयी आणि विद्यार्थ्याविषयी आस्था आहे. त्यामुळेच त्यांनी गौतम पब्लिक स्कूल या निवासी स्कूलची धुरा खांद्यावर पेलली आहे. 1300 विद्यार्थी असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना खास पत्र लिहून, लॉकडाउनच्या काळात आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले आहे.

या ऍपद्वारे विद्यार्थ्यांना व्यग्र ठेवतानाच, घरातील लहान-मोठ्या कामांमध्ये पाल्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याबाबत त्यांनी सूचित केले आहे. त्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी "लॉकडाउनचा काळ सुखाचा आणि शिकायचाही!' हे नवे समीकरण जन्माला घातले आहे... चैताली यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा अयांश हाही या ऍपद्वारे खेळतोही आणि अभ्यासही करतो. 
 

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार
लॉकडाउनच्या स्थितीत अगदी सहजपणे घरात मिळणाऱ्या साहित्याद्वारे तुम्ही मुलांची करमणूक करू शकता आणि त्यातूनच त्यांचा अभ्यासही घेऊ शकता. सध्या पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हा उपक्रम आहे. मात्र 15 ते 22 या वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठीही विशेष उपक्रम आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मानसिक भूमिकांना साजेसाच हा उपक्रम असेल, असा प्रयत्न आहे. 
- चैताली काळे 
सचिव, कर्मवीर शंकरराव काळे शिक्षण संस्था