सावधान! आता लॉकर्सची चौकशी शक्‍य 

सुनील पाटील - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्या. याचा फायदा घेऊन जास्त दराने सोने विकणाऱ्यांवर छापासत्र सुरू झाले आणि आता ज्यांनी दोन नंबरचे पैसे बॅंकांमधील लॉकरमध्ये ठेवले आहेत, अशांची लॉकरही तपासली जाणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावरून झळकत आहेत. याचा अनेक बांधकाम व्यावसायिक, मोठे बिल्डर, डॉक्‍टर्स, उद्योजक व प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्यांनी धसका घेतला आहे. 

देशातील काळा पैसा बाहेर आणण्यासाठी 8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटा बंदीची घोषणा केली आणि अनेकांची झोपच उडाली. 30 डिसेंबरपर्यंत ज्यांच्याकडे जेवढी रक्कम आहे, तेवढी रक्कम बॅंकेत भरण्याची मुभा दिली आहे. नोटा बंदीचा आदेश आल्यानंतर सर्वसामान्य लोक आपल्याकडे जेवढे हजार - दोन हजार रुपये आहेत तेवढे घेऊन बॅंकांमध्ये पैसे बदलण्यासाठी रांगेत उभे राहत आहेत. पण ज्यांच्याकडे जास्त रक्कम आहे, ती रक्कम बदलून आणायची कशी, हा प्रश्‍न समोर असतानाच दिवस कमी होईल तसे अनेकांना घाम फुटू लागला आहे. 

जादा रक्कम सोन्यामध्ये गुंतवण्यासाठी अनेक जण सरसावले. याचा फायदा घेऊन प्रति दहा ग्रॅम सोन्याची एकाच दिवसात चार हजार रुपयांची वाढ झाली. सराफांनी तर अशा ग्राहकांची अक्षरश: लूट केली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून अशांना चाप बसविण्याचे काम केले आहे. या सर्वातून मोठमोठ्या बॅंका व खासगी ठिकाणी असणाऱ्या लॉकर्सचीही चौकशी होणार की काय, अशी भीती सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे. याचा अनेकांनी धसका घेतला आहे. डॉक्‍टर, मोठे बिल्डर, उद्योगपतींसह बड्या लोकांची लॉकर्स तपासली जातील, अशाही शंका फेसबुक, व्हॉटस्‌ऍपसह इतर सोशल मीडियावरून घेतल्या जात आहेत. या शंकेने अनेकांनी आपली लॉकर्स रिकामी करण्यास सुरवात केली आहेत.

Web Title: The lockers will be checked at the post on social media