इथून चालणार खासदार लोखंडेंचा कारभार 

Lokhande will get office
Lokhande will get office
Updated on

नगर : खासदार नसतानाही दिलीप गांधी यांचा आयटीआयनजीक ग्रामीण विकास यंत्रणेच्या सरकारी जागेवर ताबा होता. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोचाव्यात, यासाठी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना सुविधा केंद्रासाठी जागा मिळत नसल्यासंदर्भात "सकाळ'ने आवाज उठविला. त्यावर प्रशासनाने तातडीने दखल घेत ताबा मिळविला. तेच कार्यालय अखेर खासदार सदाशिव लोखंडे यांना सुविधा केंद्रासाठी देण्यात आले. 

खासदार लोखंडे यांनी खासदार सुविधा केंद्राची मागणी केल्यावर "सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर नुकतीच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून खासदार सुविधा केंद्रासाठी जागा मंजूर करण्यात आली. यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी याबाबतचा निर्णय खासदार लोखंडे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना कळविला आहे. केंद्र सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत थेट पोचाव्यात, विविध योजनांची माहिती सुलभ रीतीने नागरिकांना मिळावी, यासाठी सुविधा केंद्राची संकल्पना जिल्हास्तरावर पुढे आली. 

खासदार सुविधा केंद्रासाठी सरकारी जागा संबंधित लोकसभा सदस्याला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. मागील वेळी नगर मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार दिलीप गांधी यांनी खासदार सुविधा केंद्रासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यासाठी त्यांना आयटीआयनजीक सरकारी जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, लोकसभा निवडणूक होऊन गेली तरीही त्यांचा ताबा कायम होता. त्यानंतर "सकाळ'ने आवाज उठविला. यंत्रणा खडबडून जागी झाली. सूत्रे हलवली अन्‌ लागलीच प्रशासनाने ताबा मिळवला. त्यानंतर खासदार लोखंडे यांना प्रकल्प संचालकाने हेच सुविधा केंद्र उपलब्ध करून दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is Property Card in Maharashtra?
Muslim Gorakshak Dal in Miraj
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Sangli Accident News Konkan tourism
Marathi News Esakal
www.esakal.com