Loksabha 2019 : धैर्यशील माने यांच्याकडे ४.७७ कोटींची संपत्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडे चार कोटी ७७ लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नी वेदांतिका यांच्याकडे २१ लाख ९५ हजार रुपयांची संपत्ती आहे. श्री. माने यांच्या नावावर विविध बॅंकांचे चार कोटी १५ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज आहे. 

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडे चार कोटी ७७ लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नी वेदांतिका यांच्याकडे २१ लाख ९५ हजार रुपयांची संपत्ती आहे. श्री. माने यांच्या नावावर विविध बॅंकांचे चार कोटी १५ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज आहे. 

धैर्यशील यांनी गेल्या आठवड्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. तथापि, संपत्तीचे विवरणपत्र आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सादर केले. त्यांच्या नावावर १६ लाख ६७ हजार रुपयांचे एकच वाहन आहे; तर त्यांच्या पत्नी व मुलाकडे वाहन नाही. श्री. माने यांच्या विविध बॅंकांतील बचत खाते व ठेवीच्या स्वरूपात सहा लाख ७० हजार रुपये, तर वेदांतिका यांच्या नावावर तीन लाख ७१ हजार रुपये आहेत. श्री. माने यांच्या नावावर ७० हजारांचे, तर सौ. माने यांच्या नावावर विविध संस्थांची पाच लाखांची 
गुंतवणूक आहे. 

दोन लाख ६८ हजारांचे सोने
धैर्यशील माने यांच्याकडे ३२ हजारांची, तर त्यांच्या पत्नी वेदांतिका यांच्याकडे २७ हजारांची रोकड आहे. धैर्यशील यांच्याकडे दोन लाख ६८ हजारांचे सोन्याचे दागिने, तर वेदांतिका यांच्याकडे पाच लाख ४७ हजारांचे, तर मुलीकडे एक लाख ३८ हजारांचे दागिने आहेत.

एक कोटीची जमीन 
धैर्यशील माने यांच्या नावावर विविध गावांत एक कोटी १८ लाख ९३ हजार रुपयांची शेतजमीन आहे. वेदांतिका यांच्या नावे सात लाख ५१ हजारांची जमीन आहे. याशिवाय, दोन कोटी ५४ लाख ४४ हजार रुपयांची मालमत्ता ही बिगरशेती, घर, व्यापारी गाळे या स्वरूपात आहे. 

चार कोटी कर्ज
धैर्यशील माने यांनी वाहनांसाठी सहा लाख ६३ हजारांचे कर्ज घेतले आहे. याशिवाय, महालक्ष्मी टेक्‍स्टाईल्सचे भागीदार म्हणून पंजाब नॅशनल बॅंकेचे ३७ लाख १० हजारांचे कॅश क्रेडिट कर्ज आहे. एकूण त्यांच्या नावावर चार कोटी १५ लाख ९९ हजारांचे कर्ज आहे.

Web Title: Loksabha 2019 Dhairyasheel Mane property