Election Results : राजू शेट्टी पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असून धैर्यशील माने आघाडीवर आहेत असे चित्र आहे.

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असून धैर्यशील माने आघाडीवर आहेत असे चित्र आहे.  धैर्यशील माने यांना 75274 मते मिळाली आहेत तर राजू शेट्टी यांना 54935 मते मिळाली आहेत. माने हे  21,339 मतांनी आघाडीवर आहेत.

मतदार संघ निहाय आकडेवारी अशी....

पहिली फेरी

मतदारसंघ       धैर्यशील माने      राजू शेट्टी 

शिरोळ             4927              9107
हातकणंगले      7148                 5854
इचलकरंजी      9753              3957
शाहूवाडी        4084                 2418
शिराळा          4000               6039
वाळवा          5146                  7638
एकूण           35058               35004

केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या हातकणंगलेचा खासदार कोण? याचा फैसला आज होत आहे. या मतदारसंघातील निकालाची प्रचंड उत्सुकता असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. दुपारपर्यंत निकालच कल स्पष्ट होईल, तर संपूर्ण निकाल जाहीर होण्यास रात्र होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघात २३ एप्रिल रोजी चुरशीने ७० टक्के मतदान झाले. मतदानानंतर महिन्यांनी आज (ता. २३) या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलाव परिसरातील पाटबंधारे विभागाच्या गोदामात होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी २० टेबलवर सुरू आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील १२० टेबलवरील मते एकत्रित मतमोजणी होईल. अशा लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात २६ फेऱ्या होतील.  

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख ७२ हजार ५६३ पैकी १२ लाख ४५ हजार ७९७ मतदान झाले आहे. येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात चुरशीची लढत आहे. मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ असल्याने निकालाबाबत उत्सुकता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Results Hatkanangale constituency